बालदिनी लोककल्पतर्फे 32 गावांतील शाळांना शैक्षणिक साहित्य-मिठाईचे वितरण
बेळगाव : लोककल्प फाउंडेशनतर्फे बालदिनाचे औचित्य साधत लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटी लि. ने खानापूर तालुक्यातील दत्तक घेतलेल्या 32 गावांतील शाळांमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक किट्स आणि मिठाईचे वितरण केले. या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्याबरोबरच दूरवरच्या गावांमध्ये सणासुदीचे वातावरण निर्माण करणे हा होता. लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटी लि.चे चेअरमन डॉ. किरण ठाकुर यांच्या दूरदृष्टीतून हा कार्यक्रम राबविण्यात आला. ग्रामीण विकास आणि बाल कल्याण यासाठी त्यांची असलेली बांधिलकी संस्थेच्या उपक्रमांना सतत दिशा देते. विद्यार्थी आणि शिक्षकांनी या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. ग्रामीण भागातील शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी आणि दुर्लक्षित परिसरातील मुलांना सातत्याने प्रोत्साहन व संसाधने मिळवून देण्यासाठी लोककल्प फाउंडेशन सातत्याने कार्यरत आहे. या उपक्रमातून संस्थेने तऊण मनांना सशक्त करण्याचे आणि गावांतील शैक्षणिक पायाभूत सुविधा बळकट करण्याचे आपले वचन पुन्हा अधोरेखित केले.