लोककल्प-श्री महिला क्रेडिट सोसायटीतर्फे शाळांना कॉम्प्युटर, प्रिंटर भेट
बेळगाव : लोककल्प फाऊंडेशन व श्री महिला क्रेडिट सौहार्द सहकारी संघ नियमित संस्थेच्यावतीने ग्रामीण भागातील शाळांना कॉम्प्युटर व प्रिंटर भेट स्वरुपात देण्यात आला. खानापूर तालुक्यातील कालमणी येथील सरकारी शाळेला चार कॉम्प्युटर व एक प्रिंटर तर कुसमळी येथील शाळेला एक प्रिंटर देण्यात आला. ग्रामीण भागातील शाळांपर्यंत डिजिटल ज्ञान पोहोचावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला होता. या कार्यक्रमाला श्री महिला क्रेडिट सौहार्द सहकारी संघ नियमित सोसायटीच्या चेअरमन प्रतिभा दडकर, सीईओ तन्वी वेलंगी तसेच लोककल्प फाऊंडेशनचे अनिकेत पाटील, संतोष कदम, संदीप पाटील, कालमणी व कुसमळी शाळेचे एसडीएमसी सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. उपस्थित ग्रामस्थांनी दोन्ही संस्थांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या उत्तम सुविधा उपलब्ध होण्यासाठी संस्थांनी केलेल्या प्रयत्नांबद्दल आभार मानले.