लोककल्प-पंख इंडिया फौंडेशनतर्फे गोल्याळीत शिबिर
11:12 AM Jan 08, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
बेळगाव : लोककल्प फौंडेशन व पंख इंडिया फौंडेशन यांच्यावतीने खानापूर तालुक्यातील गोल्याळी येथे विद्यार्थिनींसाठी मासिक पाळी व स्वच्छता याबद्दल शिबिर घेण्यात आले. 60 हून अधिक विद्यार्थिनींनी याचा लाभ घेतला. याप्रसंगी पंखच्या गौरी मांजरेकर, लोककल्पच्या सुहासिनी पेडणेकर यांनी मासिक पाळीमध्ये स्वच्छता, पॅड्सचा वापर व विघटन याबद्दल माहिती दिली. या विषयाबद्दल असलेली नकारात्मकता दूर करण्यासाठी या शिबिराची मदत झाली. शिबिराबद्दल शाळेच्या पदाधिकाऱ्यांनी पंख व लोककल्पचे आभार मानले.
Advertisement
Advertisement