For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

लोककल्प फौंडेशनतर्पे चिगुळे येथील रुग्णाची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया

12:45 PM Feb 05, 2026 IST | Tarun Bharat Portal
लोककल्प फौंडेशनतर्पे चिगुळे येथील रुग्णाची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया
Advertisement

बेळगाव : लोककल्प फौंडेशनतर्फे ग्रामीण भागातील गरजू रुग्णांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने नेत्रदर्शन सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल (डॉ. अग्रवाल आय हॉस्पिटल) यांच्या संयुक्त विद्यमाने चिगुळे (ता. खानापूर) येथील रुग्णाची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली. ही शस्त्रक्रिया नेत्रदर्शन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे नेत्रतज्ञ डॉ. अवधुत वागळे यांनी यशस्वीरित्या पूर्ण केली. त्यांना नेत्रदर्शनचे साहाय्यक व्यवस्थापक उदयकुमार यांचे सहकार्य लाभले. यावेळी लोककल्प फौंडेशनचे प्रसाद असूकर आणि अनिकेत पाटील यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले. या उपक्रमामुळे रुग्णाच्या जीवनमानात सुधारणा झाली असून रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांनी कृतज्ञता व्यक्त केली. लोकमान्य सोसायटीचे चेअरमन डॉ. किरण ठाकुर यांच्या मार्गदर्शनातून ग्रामीण भागातील नागरिकांना अत्यावश्यक सुविधांची पूर्तता करून देण्याच्या उद्देशाने लोककल्प फौंडेशन सातत्याने कार्यरत आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.