लोककल्प फाऊंडेशनच्यावतीने शाळांना वॉटर फिल्टरची भेट
11:38 AM Jul 05, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
बेळगाव : लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीच्या लोककल्प फाऊंडेशनतर्फे शालेय विद्यार्थ्यांना शुद्ध पाण्याचा पुरवठा व्हावा, यासाठी पाण्याचे फिल्टर देण्यात आले. खानापूर तालुक्यातील आमटे, ओलमणी व कुसमळी या गावातील सरकारी शाळांना टाटा स्वच्छ वॉटर फिल्टर देण्यात आला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक तसेच आरोग्याच्या उत्तम सुविधा मिळाव्यात, यासाठी लोककल्प फाऊंडेशनच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबविले जात आहेत. अशुद्ध पिण्याच्या पाण्यामुळे लहान मुलांना अनेक गंभीर आजार जडत असल्याने फाऊंडेशनने वॉटर फिल्टर देण्याचा निर्णय घेतला. सोसायटीचे चेअरमन डॉ. किरण ठाकुर यांच्या संकल्पनेतून दुर्गम भागातील गावांचा विकास केला जात आहे. वॉटर फिल्टर दिल्याबद्दल शाळांच्या मुख्याध्यापकांनी आभार मानले. यावेळी शाळेचे विद्यार्थी, पालक व शिक्षक उपस्थित होते.
Advertisement
Advertisement