महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

लोककल्पतर्फे आयएमईआरचे संचालक, प्राध्यापक -विद्यार्थ्यांचा सत्कार

11:54 AM Jul 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : लोककल्प फौंडेशनने केएलएस संचालित आयएमईआरचे संचालक, प्राध्यापक व विद्यार्थी यांचा नुकताच सत्कार केला. लोककल्पने गोवा-कर्नाटकच्या सीमेवरील 32 गावे दत्तक घेतली आहेत. या दुर्गम गावात अद्याप अपेक्षित सुविधा पोहोचल्या नाहीत. लोककल्पने लोकमान्य मल्टिपर्पज सोसायटीचे चेअरमन किरण ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली या 32 गावात विविध उपक्रम राबविले आहेत. लोककल्पतर्फे या गावांमध्ये ग्रामस्थांसाठी सातत्याने आरोग्य शिबिरे घेण्यात आली. येथील शाळांना व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्यात आले. हे उपक्रम आजही सुरू आहेत. लोककल्पच्या माध्यमातून या गावांमध्ये काही सुविधा सुरू करण्यात आल्या आहेत. या 32 गावांवर आयएमईआरने सर्वेक्षण करून अहवाल तयार केला आहे. याबद्दल फौंडेशनच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी लोककल्पच्या सीएसआर व्यवस्थापक मालिनी बाली, सूरजसिंह रजपूत यांनी आयएमईआरचे संचालक डॉ. अरीफ शेख, प्रा. श्रीरंग देशपांडे, विद्यार्थी यांचा सत्कार केला.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article