महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

राज्यभरात 40 ठिकाणी लोकायुक्त धाडसत्र

06:06 AM Nov 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

11 अधिकाऱ्यांना दणका : बेहिशेबी मालमत्ता संपादन प्रकरणी तडकाफडकी कारवाई

Advertisement

प्रतिनिधी/ बेंगळूर

Advertisement

बेहिशेबी मालमत्ता संपादन प्रकरणी दाखल झालेल्या तक्रारींच्या आधारावर मंगळवारी सकाळी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये 11 अधिकाऱ्यांवर लोकायुक्त विभागाने छापे टाकले. 40 ठिकाणी छापेमारी करण्यात आली असून भ्रष्ट अधिकाऱ्यांजवळ बेकायदा मालमत्ता आढळली आहे. बेंगळूर, बेळगाव, म्हैसूर, दावणगेरे, बिदर, हावेरी आणि धारवाड जिल्ह्यांमध्ये ही कारवाई करण्यात आली आहे.

लोकायुक्त छाप्यामुळे भ्रष्ट अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले असून त्यांच्याजवळ आढळलेल्या बेकायदा मालमत्तेचा तपशिल गोळा केला जात आहे. 11 अधिकाऱ्यांची निवासस्थाने, त्यांचे नातलग, कुटुंबीयांच्या मालमत्तांवरही एकाच वेळी छापे टाकण्यात आले आहेत. काही अधिकारी खासगी कार्यालये, रियल इस्टेट एजन्सी चालवत असल्याचे कारवाईवेळी उघडकीस आले. अपार्टमेंट आणि वसाहती निर्मितीसंबंधीही काही जणांकडे कागदपत्रे आढळली आहेत. धारवाडमध्ये तीन ठिकाणी, बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती तालुक्यात दोन तर निपाणी तालुक्यात दोन ठिकाणी, गदग जिल्ह्यातील नरगुंद येथे एका ठिकाणी, त्याचप्रमाणे बिदर, दावणगेरे आणि म्हैसूरमध्येही छापे टाकण्यात आले.

धारवाडमध्ये केआयएडीबीचे साहाय्यक कार्यकारी अभियंता गोविंदप्पा यांच्या धारवाडच्या गांधीनगर कॉलनीतील निवासस्थानावर लोकायुक्त डीवायएसपी वेंकनगौडा पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली छापा टाकण्यात आला. गोविंदप्पा यांच्याशी संबंधीत मालमत्तांवरही छापे टाकण्यात आले. धारवाडमधील तीन ठिकाणी, सौंदत्ती तालुक्यात, हुली व उगरगोळ गावातील फार्महाऊस व नरगुंद येथे त्यांच्या भावाच्या निवासस्थानवर धाडी टाकण्यात आल्या आहेत.

बिदरमध्ये बेकायदा मालमत्ता संपादनाच्या आरोपावरून जिल्हा प्रशिक्षण केंद्राचे अधिकारी रविंद्र रोट्टे यांचे निवासस्थान व कार्यालयावर छापा टाकण्यात आला. लोकायुक्त डीवायएसपी हनुमंत यांच्या नेतृत्त्वाखाली ही कारवाई करण्यात आली. रविंद्र रोट्टे यांच्या बेंगळूरमधील निवासस्थानीही झडती घेण्यात आली. यापूर्वी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात शिरस्तेदार व बेंगळूर महानगरपालिकेत काम केले होते. त्यामुळे त्यांच्याजवळील मालमत्तेशी संबंधीत कागदपत्रे पडताळली जात आहेत. त्यांच्याजवळ मोठ्या प्रमाणावर रोकड, दागिने, ऐशोआरामी वस्तू आढळल्या आहेत.

म्हैसूर महानगरपालिकेचे विभागीय कार्यालय-5 मधील आयुक्त नागेश डी. यांच्या निवासस्थानी तपासणी करण्यात आली. त्यांचे श्रीरंगपट्टण आणि शिमोगा येथील निवासस्थानावरही लोकायुक्त पथकाने धाड टाकली. यापूर्वी मंड्या जिल्ह्यातील श्रीरंगपट्टणचे तहसीलदार असताना नागेश यांनी बेंगळूरच्या डॉलर्स कॉलनीत अपार्टमेंट निर्माण केले होते. म्हैसूरमधील मेटगळ्ळी येथील कार्यालयातही तपासणी करून काही कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली.

बेंगळूरमध्ये वाणिज्य कर खात्यातील अधिकारी वेंकटेश यांच्या बेळगावमधील निवासस्थानावर छापा टाकून कागदपत्रे पडताळण्यात आली. वेंकटेश हे यापूर्वी बेळगावमध्ये कार्यरत होते.

हावेरी जिल्ह्यातील राणेबेन्नूर येथे महिला-बालकल्याण खात्याचे पर्यवेक्षक ज्योती शिग्ली यांनाही लोकायुक्त अधिकाऱ्यांनी धक्का दिला आहे. त्यांच्या निवासस्थानावर धाड टाकून कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली.

दावणगेरेत छाप्यावेळी आढळल्या ऐशोआरामी वस्तू

दावणगेरे जिल्हा औद्योगिक आणि वाणिज्य खात्याचे साहाय्यक संचालक कमल राज यांच्या निवासस्थानावरील छाप्यात 1 लाख रु. रोख, इनोव्हा कार आणि बेहिशेबी मालमत्तेचा तपशिल लोकायुक्त अधिकाऱ्यांच्या हाती लागला आहे. अनुकंपा आधारावर द्वितीय श्रेणी साहाय्यक म्हणून नियुक्त झालेले कमल राज यांनी अनेक वेळा बढती मिळवून साहाय्यक संचालक पदापर्यंत मजल मारली. चित्रदुर्ग येथील त्यांच्या मालमत्तेवरही छापा टाकण्यात आला.

छापा पडताच शौचालयातून फेकले नोटांचे गठ्ठे

लोकायुक्त छापा पडल्याचे समजताच हावेरी जिल्ह्याच्या ग्रामीण पाणीपुरवठा खात्याचे हिरेकेरुर उपविभागाचे साहाय्यक अभियंता काशिनाथ भजंत्री यांनी नोटा पिशवीत बांधून बाहेर फेकून दिले. लोकायुक्त अधीक्षक एस कौलापुरे यांच्या नेतृत्त्वाखाली मंगळवारी लोकायुक्त अधिकाऱ्यांच्या पथकाने हावेरीच्या बसवेश्वरनगर येथील निवासस्थानी छापा टाकला. अधिकाऱ्यांनी दरवाजा ठोठावल्यानंतर भयभीत झालेल्या काशिनाथ भजंत्री यांनी 9 लाख रुपयांच्या नोटांचे गठ्ठे एकत्र करून शौचालयाच्या खिडकीतून बाहेर फेकून दिले. ही बाब नजरेस आल्यानंतर लोकायुक्त अधिकाऱ्यांनी ते जप्त केले. इतकेच नव्हे तर भजंत्री यांनी 2 लाख रु. अंथरुणात गुंडाळून ठेवले होते. त्यांच्या घरातून 14 लाखांची रोकड जप्त करण्यात आली.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article