For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

देवाचीहट्टी येथील नागरिकाला लोककल्प फौंडेशनचा आधार

01:03 PM Apr 07, 2026 IST | Tarun Bharat Portal
देवाचीहट्टी येथील नागरिकाला लोककल्प फौंडेशनचा आधार
Advertisement

बेळगाव : लोककल्प फौंडेशनच्यावतीने नेत्रदर्शन आय हॉस्पिटलच्या साहाय्याने देवाचीहट्टी (ता. खानापूर) येथील रुग्णाची मोतिबिंदूची मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली. डॉ. अवधूत वागळे यांनी ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली. यावेळी नेत्रदर्शनचे साहाय्यक व्यवस्थापक उदयकुमार आणि शशीकुमार उपस्थित हेते. लोककल्पचे अनिकेत पाटील आणि किशोर नाईक यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले. लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीचे चेअरमन डॉ. किरण ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील नागरिकांना आवश्यक गरजांची पूर्तता करण्याच्या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले. याबद्दल रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांनी लोककल्पचे आभार मानले.

Advertisement

Advertisement
Tags :

.