For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तेदेपकडून लोकसभा, विधानसभा उमेदवार जाहीर

06:37 AM Mar 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
तेदेपकडून लोकसभा  विधानसभा उमेदवार जाहीर
Advertisement

आंध्रप्रदेशात तेदेपकडून जोरदार प्रचार

Advertisement

वृत्तसंस्था/ अमरावती

तेलगू देसम पक्षाने आंध्रप्रदेश विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी जारी केली आहे. पक्ष राज्यातील 144 विधानसभा मतदारसंघांमध्ये निवडणूक लढविणार आहेत. यातील 139 जागांवरील उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. उर्वरित 5 जागांवरील उमेदवार लवकरच जाहीर केले जाणार आहेत. तर पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी 13 उमेदवारांची घोषणा केली आहे.

Advertisement

तेदेपने आंध्रप्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी यापूर्वीच 128 उमेदवारांची नावे जाहीर केली होती. उमेदवारांची निवड काळजीपूर्व केली जाणार आहे. तसेच मतदारसंघांची प्राथमिकता तसेच निवडणुकीची आवश्यकता विचारात घेतली जाणार असल्याचे पक्षप्रमुख एन. चंद्राबाबू नायडू यांनी म्हटले होते. तेदेत राज्यात जनसेना तसेच भाजपसोबत आघाडी करून निवडणुकीला सामोरा जात आहे.

आंध्रप्रदातील सर्व 25 लोकसभा मतदारसंघांमध्ये चौथ्या टप्प्याच्या अंतर्गत 13 मे रोजी मतदान होणार आहे. त्याचदिवशी राज्यातील सर्व 175 विधानसभा मतदारसंघांकरता मतदान होईल. तेदेपने श्रीकाकुलम लोकसभा मतदारसंघात किंजारपू राममोहन नायडू यांना तर विशाखापट्टणममध्ये मतकुमुली भरत यांना उमेदवारी दिली आहे. अमलापुरममध्ये गांति हरीश मधुर, इलुरुमध्ये पुत्ता महेश यादव, विजयवाडा येथे केसिनेनी सिवनाथ, गुंटुरमध्ये पेम्मासानी चंद्रशेखर हे उमेदवार असतील.

नारसराओपेटमध्ये पक्षाने लवू श्रीकृष्णा देवरयालु यांनी उमेदवारी दिली आहे. बपटला मतदारसंघात टी. कृष्णा प्रसाद हे तेदेपच्या वतीने लोकसभा निवडणूक लढविणार आहेत. नेल्लोरमध्ये वेमिरे•ाr प्रभाकर रे•ाr तर चित्तूरमध्ये दग्गुमाला प्रसाद राव हे पक्षाचे उमेदवार असतील.

Advertisement
Tags :

.