For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

लोकसभेचे सभापती ओम बिर्ला 8 रोजी गोव्यात

02:55 PM Apr 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
लोकसभेचे सभापती ओम बिर्ला 8 रोजी गोव्यात
Advertisement

पणजी : पश्चिम क्षेत्रीय विधानसभा सभापतींची बैठक येत्या दि. 9 आणि 10 एप्रिल रोजी मिरामार येथे होत असून या परिषदेचे उद्घाटन करण्यासाठी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला हे दि. 8 एप्रिल रोजी सायंकाळी गोव्यात येत आहे. गोवा विधानसभेचे सभापती डॉ. गणेश गावकर, गोवा विधीमंडळ सचिव नम्रता उल्मन यांनी शुक्रवारी दुपारी राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांची राजभवनवर जाऊन भेट घेतली आणि त्यांना या परिषदेचे निमंत्रण दिले. दि. 10 रोजी दोन दिवसीय परिषदेचा समारोप होणार असून यावेळी राज्यपाल हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

Advertisement

कॉमनवेल्थ पार्लमेंटरी असोसिएशनद्वारे ही परिषद घेतली जात असून तिचे यजमानपद गोवा विधानसभेकडे आहे. त्या अनुषंगाने सभापती गणेश गावकर यांनी पुढाकार घेतला आहे. या परिषदेत महाराष्ट्र, गोवा आणि गुजरात या तीन राज्यातील सभापती, विधीमंडळ सचिव, संयुक्त सचिव इत्यादी अधिकारी मंडळी सहभागी होतील. याशिवाय कर्नाटक, आंध्रप्रदेश, मध्य प्रदेश, हरियाणा, राजस्थान या राज्यांचे सभापती देखील या परिषदेत सहभागी होण्यासाठी दि. 8 एप्रिल रोजी गोव्यात दाखल होत आहेत. दि. 9 रोजी सकाळी 9.30 वा. उद्घाटन होईल. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना देखील या परिषदेला निमंत्रित केले आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.