For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Lohagad Fort जिथे सियाने केतनला ढकलले ती जागा बनली पिकनीक स्पॉट...लोहगडावर पर्यटनात ३० % नी वाढ

04:19 PM Jun 30, 2026 IST | RAHUL SADOLIKAR
lohagad fort जिथे सियाने केतनला ढकलले ती जागा बनली पिकनीक स्पॉट   लोहगडावर पर्यटनात ३०   नी वाढ
Advertisement

पुण्यातील लोहगडाची गेले काही दिवस सोशल मिडीयावर चर्चा सुरू आहे. पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक विशाल अग्रवाल यांचा मुलगा केतन अग्रवाल याची 18 जून रोजी लोहगडावरुन पाय घसरुन पडला असा बनाव करुन केतनची भावी पत्नी सिया गोयलने हत्या केली होती. पोलिसांच्या चाणक्ष नजरेमुळे लोहगडावर संशयित फिरणारा सियाचा प्रियकर चेतन चौधरी हाही या गुन्ह्यात सहभागी असल्याचे सिद्ध झाले. 

Advertisement

दरम्यान सोशल मिडियावर या गुन्ह्याची मोठी चर्चा झाली. सोबतच ज्या लोहगडावर सियाच्या क्रूर षडयंत्राचा खेळ रंगला त्या लोहगडाची सोशल मिडियावर गेल्या काही दिवसांत क्रेझ पाहायला मिळत आहे. विशेषत: तरुण तरुणी जिथे सियाने केतनला उंच कड्यावरुन ढकलून दिले तो स्पॉट नेमका कसा आहे, हे पाहण्यासाठी मोठी गर्दी करत आहे.

पर्यटनात मोठी वाढ

Advertisement

जागतिक वारसा स्थळ म्हणून गणले जाणारा लोहगड आता वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आला आहे. ठरलेले लग्न पसंत नाही म्हणून सिया गोयलने भावी पती केतन अग्रवालची अत्यंत क्रूरपणे कड्यावरुन ढकलून हत्या केली आणि सोशल मिडीयावर केतन - सियाच्या प्रकरणासोबतच जिथे ही हत्या झाली त्या लोहगडाविषयीची उत्सुकताही वाढली. मिळालेल्या माहितीनुसार लोहगडाच्या पर्यटनात २५ ते ३० % नी वाढ झाली आहे. 

हत्येच्या ठिकाणाची उत्सुकता कसली?

जिथे एका व्यक्तीला  निरपराध असूनही जीव गमवावा लागला त्या जागेला पिकनिक स्पॉट बनवणाऱ्या पर्यटकांच्या मानसिकेबद्दलही सोशल मिडीयावर आश्चर्य व्यक्त होत आहे. दरम्यान विकेंडला लोहगड पर्यटकांनी फुलून गेल्याचे पाहायला मिळाले

Advertisement
Tags :

.