रायगडच्या पायथ्याजवळील लॉजिंग आजपासून बंद
खेड :
रायगड किल्ल्यावर 12 एप्रिल रोजी अभिवाद सभेस केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह अन्य मंत्री हजेरी लावणार आहेत. सुरक्षिततेच्या दृष्टीने रायगड किल्ल्याला केंद्रीय व राज्य सरकारच्या सुरक्षा यंत्रणेचा वेढा पढणार आहे. रायगड किल्ल्याच्या पायथ्याजवळील लॉजिंगची दारेही 9 एप्रिलपासून पर्यटकांसाठी बंद करण्यात येणार आहे. सुरक्षा यंत्रणांकडून प्रत्येकाची कसून चौकशीही केली जाणार आहे.
गेल्या 15 दिवसांपासून किल्ले रायगडावर सुरक्षा यंत्रणांनी विशेष लक्ष केंद्रीत करत सुरक्षा यंत्रणा तैनात केली आहे. अमित शाह यांच्या झेड प्लस सुरक्षेसह अन्य मंत्र्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने रायगड किल्ल्यावर पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त होणार आहे. पाचाड, रायगडवाडी, हिरकणीवाडी, नेवाळेवाडी येथील लॉजिंग व्यवस्था बुधवारपासून पर्यटकांसाठी बंद करण्यात येणार आहे.