For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विविध मागण्यांसाठी लोकोपायलटचे आंदोलन

10:40 AM Apr 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
विविध मागण्यांसाठी लोकोपायलटचे आंदोलन
Advertisement

रेल्वे स्थानकावर घोषणा देत मांडल्या मागण्या

Advertisement

बेळगाव : रेल्वेचे इंजिन सांभाळणाऱ्या लोकोपायलटवर अधिकचा भार दिला जात आहे. काही दिवसांपासून रेल्वेकडून महागडी यंत्रे लोकोपायलटकडे दिली जात असल्याने जबाबदारीही वाढली आहे. तसेच दररोज 25 ते 30 किलो वजन घेऊन लोकोपायलटला सेवा द्यावी लागत असल्याने रेल्वे प्रशासनाने याची दखल घेत रेल्वे इंजिनमध्येच सर्व यंत्रे उपलब्ध करून द्यावीत, या मागणीसाठी रविवारी बेळगावमधील लोकोपायलटनी रेल्वे स्थानक परिसरात आंदोलन केले. बेळगाव परिसरातील लोकोपायलटनी आंदोलन करत आपल्या मागण्या लावून धरल्या. लोकोपायलट एक अतिशय जबाबदारीची सेवा आहे. रेल्वे इंजिन चालविताना समोरून येणाऱ्या अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागते. यापूर्वी सुरक्षा उपकरणे बॉक्समधून पुरविली जात होती. डेटोनेटर, हॅमरसह इतर वस्तू बॉक्समधून दिल्याने सोय होत होती. परंतु आता या वस्तू स्वतंत्र देतात. यामुळे लोकोपायलटला दररोज 25 ते 30 किलो वजन घेऊन ये-जा करावी लागते. त्यातच आता रेल्वेकडून एफएसटी हे नवीन डिव्हाईस लोकोपायलटकडे देण्यात आले आहे. यातील अनेक उपकरणे महागडी असून ती कुठेही गहाळ होणार नाहीत याचीही चिंता लोकोपायलटला असते. त्यामुळे रेल्वे इंजिनमध्येच सर्व सुरक्षा यंत्रणा पुरवावी, या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले. सुमित पारीख यांच्यासह इतर लोकोपायलटनी रेल्वे स्थानकामध्ये आंदोलन केले.

Advertisement
Advertisement
Tags :

.