यरगट्टीत पोलीस स्थानक उभारण्याची स्थानिकांची गृहमंत्र्यांकडे मागणी
12:10 PM Nov 27, 2025 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
बेळगाव : यरगट्टी तालुका घोषित करून पाच वर्षे उलटली तरीही यरगट्टीत पोलीस स्थानक उभारण्यात आले नाही. या गावात पोलीस आऊटपोस्ट आहे. केवळ चार पोलीस येथे काम करतात. लवकरात लवकर पोलीस ठाण्याचे काम सुरू करावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी गृहमंत्र्यांकडे केली आहे. बुधवारी गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर हे बेळगावला आले होते. यरगट्टी येथे स्थानिक नागरिकांनी रयत संघटनेचे सोमू रैनापूर यांच्या नेतृत्वाखाली गृहमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. या परिसरात खून, घरफोड्या, दरोडे, गुंडगिरी वाढली आहे. अपघातही वाढत चालले आहेत. परिसरातील 37 गावांचा मिळून शनिवारी यरगट्टीत बाजार भरतो. जनावरांचाही मोठा बाजार भरतो. केवळ चार पोलिसांमुळे काम चालणार नाही. त्यामुळे लवकरच स्वतंत्र पोलीस ठाण्याचे काम सुरू करावे, अशी मागणी करण्यात आली.
Advertisement
Advertisement
Advertisement
Next Article