For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बाजारात स्थानिक आंबा दाखल

06:29 AM Apr 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
बाजारात स्थानिक आंबा दाखल
Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisement

मागील काही दिवसांपासून प्रतीक्षेत असलेला स्थानिक आंबाही बाजारात दाखल होऊ लागला आहे. त्यामुळे आंब्याने बाजारपेठ बहरू लागली आहे. हापूस, पायरी, केशर, माणकूर आदी जातीचे आंबे पहावयास मिळत आहेत. स्थानिक आंबा दाखल झाल्यानंतर आंब्याचे दर काहीसे कमी होतात. मात्र स्थानिक आंबा वगळता इतर आंब्यांचे दर चढेच आहेत.

उष्मा वाढू लागल्याने रसाळ फळांना मागणी वाढली आहे. त्यामुळे आंब्यांनाही पसंती दिली जात आहे. देवगड, सिंधुदुर्ग, मालवण, रत्नागिरी येथून हापूस मोठ्या प्रमाणात दाखल होऊ लागला आहे. त्याचबरोबर बेळगाव, धारवाड, हुबळी येथूनही लोकल आंबा येवू लागला आहे. बाजारात हापूस 600 ते 1200 रुपये डझन, पायरी 500 रुपये डझन, माणकूर 1400 रुपये तर स्थानिक आंबा 200 ते 250 रुपये डझनप्रमाणे विकला जात आहे.

Advertisement

यंदा वाढत्या उष्म्यामुळे आंबा उत्पादनात वाढ झाली आहे, असा अंदाज बागायत खात्याने वर्तविला आहे. बाजारात हापूसबरोबरच इतर जातीचे आंबे हळूहळू दाखल होत आहेत. मात्र दर आवाक्याबाहेर असल्याने विक्रीवर परिणाम होत आहे. मात्र आता बाजारात सर्वसामान्यांना परवडणारा स्थानिक आंबा दाखल झाला आहे. त्यामुळे खरेदी करणे सोयीस्कर होणार आहे.

हापूसच्या नावाखाली स्थानिक आंब्यांची विक्री करून ग्राहकांची फसवणूक केली जात आहे. हापूसच्या बॉक्समध्ये स्थानिक आंबा घातला जात आहे. बाहेर बॉक्सवर मालवण हापूस असा उल्लेख आहे. त्यामुळे सर्वसामान्य हापूस या नावाने आंबा खरेदी करत असले तरी तो लोकल आंबा असू शकतो. त्यामुळे आंबा खरेदी करतेवेळी खबरदारी घेणे आवश्यक आहे.

Advertisement

.