कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

१२ लाखांचा गोवा बनावटीचा दारूसाठा जप्त

02:42 PM Nov 09, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

स्थानिक गुन्हे अन्वेषणची बांदा येथे मोठी कारवाई ; सांगलीचे दोघे ताब्यात

Advertisement

प्रतिनिधी
बांदा
​स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने गोवा-मुंबई मार्गावरील हॉटेल कावेरी बांदा येथे धडक कारवाई करत १२ लाख ११ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये गोवा बनावटीच्या दारूसाठ्यासह इनोव्हा कारचा समावेश आहे. याप्रकरणी सांगली जिल्ह्यातील दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.​ आकाश नामदेव खोत (वय २५, रा. सलगरे, जि. सांगली)​विठ्ठल पांडुरंग नाईक (वय ४८, रा. विश्रामबाग, जि. सांगली) अशी त्यांची नावे आहेत. गोवा बनावटीच्या दारू वाहतुकीविरोधात सिंधुदुर्ग पोलीस ऍक्शन मोडवर असुन रविवारी दिनांक ०९ नोव्हेंबर पहाटे ०३:३० वाजता, हॉटेल कावेरी, बांदा, गोवा-मुंबई महामार्ग येथे इनोव्हा कारची तपासणी केली असता त्यात गोवा बनावटीची दारू आढळून आली. यात १२ लाख, ११ हजार २०० रुपये किंमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला. यात दहा लाखाची ​इन्होव्हा कार व २लाख ११ हजार २००​गोवा बनावटीची दारू असा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.ही कारवाई ​सिंधुदुर्गचे पोलीस अधीक्षक मोहन दहिकर, अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या सुचनेनुसार ही कारवाई करण्यात आली. पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक सुरेश राठोड, पोलीस अंमलदार अमर कांडर आणि महेश्वर समजिसकर यांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने ही कारवाई यशस्वी केली.​याप्रकरणी बांदा पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. गोवा राज्यातून महाराष्ट्रात होणारी अवैध दारूची वाहतूक रोखण्यासाठी सिंधुदुर्ग पोलिसांनी उचललेले हे महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
# tarun bharat sindhudurg # news update# breaking news # konkan update#
Next Article