स्थानिक गुन्हे शाखेकडून पिस्टलच्या कारवाईचे शतक पूर्ण
सातारा :
शिंदेवाडी (ता. खंडाळा) गावच्या हद्दीत पिस्टल विक्री करण्यासाठी आलेल्या दोन इसमांपैकी एकाला ताब्यात घेण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. त्याच्याकडून चार पिस्टल व चार जिवंत काडतुसे असा दोन लाख 61 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शुभम उर्फ सोनू अनिल शिंदे (रा. महर्षीनगर, स्वारगेट, पुणे) असे संशयिताचे नाव आहे. दरम्यान, पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली नोव्हेंबर 2022 पासून आजअखेर स्थानिक गुन्हे शाखेने पिस्टलच्या कारवाईचे शतक पूर्ण झाले आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना माहिती मिळाली की, दोन इसम शिंदेवाडी (ता. खंडाळा, जि. सातारा) गावच्या हद्दीतील सातारा ते पुणे राष्ट्रीय महामार्गाच्या सेवारस्त्यावर प्रणव अॅग्रो कंपनीच्या कंपाऊंडजवळ देशी बनावटीचे पिस्टल व जिवंत काडतुसे विक्री करण्याकरिता येणार आहेत. त्यानुसार सोमवारी सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित फार्णे व पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिगाडे यांच्या अधिपत्याखालील पथक तयार करण्यात आले. या पथकाने शिंदेवाडी येथे जाऊन संशयित शुभम उर्फ सोनू अनिल शिंदे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडील काळ्या रंगाच्या बॅगेत चार देशी बनावटीची पिस्टल व चार जिवंत काडतुसे असा एकूण दोन लाख 61 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. त्यानंतर पथकाने त्याला ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, रोहित फार्णे, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, परितोष दातीर, पोलीस अंमलदार अतिष घाडगे, शिवाजी गुरव, संजय शिर्के, विजय कांबळे, संतोष सपकाळ, शरद बेबले, लक्ष्मण जगधने, लैलेश फडतरे, अमित झेंडे, प्रवीण फडतरे, अमित माने, शिवाजी भिसे, अरुण पाटील, गणेश कापरे, अविनाश चव्हाण, स्वप्नील कुंभार, ओंकार यादव, मोहन पवार, विशाल पवार, रोहित निकम, सचिन ससाणे, पृथ्वीराज जाधव, संकेत निकम, रवि वर्णेकर, विजय निकम यांनी केली आहे.
धडाकेबाज शतकी कारवाया
सातारा जिल्हा पोलीस दलाकडून नोव्हेंबर 2022 पासून आजपर्यंत 102 देशी बनावटीची अग्निशस्त्रs, चार बारा बोअर बंदुका, दोन रायफल, 229 काडतुसे व 383 रिकाम्या पुंगळ्या व चार मॅग्झीन जप्त करून धडाकेबाज शतकी कारवाई करण्यात आलेली आहे.