महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एप्रिलमध्ये शक्य

12:16 PM Jan 04, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

कोल्हापूर : 

Advertisement

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणूका एप्रिल महिन्यात होण्याची शक्यता असल्याचे संकेत खासदार धनंजय महाडिक यांनी शुक्रवारी दिले. तसेच महापालिका निवडणूक चार सदस्यीय प्रभाग रचनेनुसार होईल असेही त्यांनी सांगितेल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका भाजपसह महायुती ताकदीने लढवणार असून, भाजपमध्ये प्रवेशासाठी अनेक बडे नेते इच्छूक असल्याचा दावाही खासदार महाडिक यांनी केला.

Advertisement

खासदार धनंजय महाडिक यांनी शहरातील विविध विकासकामांचा आढावा शुक्रवारी दुपारी महापालिकेत घेतला. यावेळी प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांच्यासह अधिकरी उपस्थित होते. या आढावा बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

महाडिक म्हणाले, कोरोना आणि इतर कारणांमुळे राज्यासह जिह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका रखडल्या आहेत. या निवडणूका एप्रिल महिन्यामध्ये लागण्याची शक्यता आहे. यामुळे जिह्यातील महापालिका, जिल्हापरिषद, नगरपालिका तसेच नगरपरिषदेच्या निवडणूकांची रणधुमाळी लवकरच सुरु होईल. आगामी सर्वच निवडणूकांमध्ये भाजप आणि महायुती ताकदीने एकत्रितपणे लढणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

                                     चार सदस्यीय प्रभाग रचना शक्य

महापालिका निवडणूकीची रणधुमाळी एप्रिलमहिन्यात उडण्याची शक्यता आहे. याचसोबत महापालिका निवडणूकीमध्ये चार सदस्यीय प्रभाग रचना होणार असल्याचे संकेतही खासदार धनंजय महाडिक यांनी दिले. महापालिकेच्या हद्दवाढीमध्ये जी गावे येण्यासाठी इच्छूक आहेत. त्यांच्याशी चर्चा करुन हद्दवाढीचा निर्णय घेण्यात येणार असल्याचेही खासदार महाडिक यांनी सांगितले.

                               भाजपमध्ये प्रवेशासाठी इच्छूकांची संख्या मोठी

माजी आमदार संजय घाटगे यांच्या भाजप प्रवेशाबाबत विचारणा केली असता, भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी जिह्यातील अनेक नेते इच्छुक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आगे आगे देखो होता है क्या, अशा शब्दात त्यांनी नेत्यांच्या भाजप प्रवेशाचे संकेत दिले. राजकारणात टिका ही होतच असते. मात्र कावीळ झाल्यामुळे सगळे जग पिवळे दिसते, अशी स्थिती विरोधकांची झाल्याचा टोलाही महाडिक यांनी लगावला.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article