महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

लोबो, पाटकर यांचा एकत्र विमान प्रवास

11:45 AM Nov 24, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

राजकीय खेळी की मैत्रीसाठी काहीपण : लोबो, अमित पाटकर यांच्यात दिलजमाई?

Advertisement

पणजी : लोकसभा निवडणुका तोंडावर आल्याने राजकीय वातावरण तापत आहे. अशातच गोवा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर आणि काँग्रेसच्या उमेदवारीवर निवडून आलेले व नंतर भाजपात प्रवेश केलेले कळंगुटचे आमदार मायकल लोबो, गोवा प्रदेश काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी कॅप्टन व्हरियातो फर्नांडिस हे काल गुऊवारी सकाळी घाईघाईत बेंगलोरला विमानाने रवाना झाल्याने राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क लढविण्यात येत आहेत. सभापती रमेश तवडकर यांच्यासमोर आमदार अपात्रता याचिका असून, अमित पाटकर यांनी मायकल लोबो व आमदार दिगंबर कामत यांच्याविऊद्ध ही याचिका दाखल केली होती. या अचानक दौऱ्यामुळे ही राजकीय खेळी की मैत्रीसाठी कायपण? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Advertisement

कोण, कोणाला भेटणार?

काँग्रेसमधून फुटून भाजपात प्रवेश केल्यानंतर आमदार लोबो व पाटकर यांच्यात दुरावा निर्माण झाला होता. या दोघांनीही परस्परांवर आरोप-प्रत्यारोप केले होते. परंतु काल अचानक हे दोघेही बेंगलोरला गेले. बेंगलोर येथील भाजप पक्षश्रेष्ठींना पाटकर भेटणार की, काँग्रेस नेत्यांना आमदार लोबो भेटणार हे गुलदस्त्यात आहे.

कोण काय सोडणार, जाणार कुठे?

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पाटकर यांच्या भूमिकेवर त्यांचे कार्यकर्तेच प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आहेत. ते राज्यातील महत्त्वाच्या विषयांवर सरकारविऊद्ध आवाज उठविण्यास कमी पडतात, असा काहीसा सूर काँग्रेस नेत्यांतूनही सुरू आहे. पाटकर यांच्याविऊद्ध दिल्लीतील काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे कार्यकर्ते व नेत्यांनीही तक्रारी केल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समाजते. त्यामुळे पाटकर भाजपवासी होणार की भाजपात नाराज असलेले मायकल लोबो काँग्रेसात पुन्हा येणार याबाबत शंका व्यक्त होत आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article