For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Umbraj Fraud Case | कर्जाचा डोंगर महिलांच्या नावावर, अन 'तो' मात्र फरार; सुतार बाड्यातील त्या घराचं गूढ वाढलं!

11:55 AM May 11, 2026 IST | NEETA POTDAR
umbraj fraud case   कर्जाचा डोंगर महिलांच्या नावावर  अन  तो  मात्र फरार  सुतार बाड्यातील त्या घराचं गूढ वाढलं
Advertisement

                                              पाल गावात फायनान्स घोटाळा उघडकीस

Advertisement

उंब्रज : पाल (ता. कराड) येथील एकाने गावातील काही महिलांच्या नावावर फायनान्स कंपनीकडून लाखो रुपयांचे कर्ज काढून त्यांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. संबंधित व्यक्ती पैसे घेऊन फरार झाल्याने महिलांवर कर्जफेडीची वेळ आली आहे. संतप्त महिलांनी रविवारी उंब्रज पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल करून कठोर कारवाईची मागणी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पाल येथील युनूस लाला सुतार (रा. सुतार बाडा, पाल, ता. कराड) याने गावातील महिलांचा विश्वास संपादन करून व त्यांना पैशाचे आमिष दाखवून त्यांच्या नावावर फायनान्समार्फत प्रत्येकी एकते तीन लाख रुपयांपर्यंत कर्ज काढल्याचा आरोप करण्यात आला आहे. महिलांच्या म्हणण्यानुसार, संबंधिताने स्वतः डुप्लिकेट स्वाक्षऱ्या करून कर्जाची रक्कम घेतली होती. कर्जाची जबाबदारी मी घेतो, तुम्ही टेन्शन घेऊ नका, असे सांगून त्याने महिलांना विश्वासात घेतले होते.

Advertisement

सुरुवातीच्या काही महिन्यांत युनूस सुतार नियमितपणे हप्ते भरत होता. फायनान्स कंपनीचा प्रतिनिधी दर आठवड्याला अथवा पंधरा दिवसांनी हप्ते घेण्यासाठी येत असल्याने महिलांनाही कोणतीही शंका आली नाही. मात्र अचानक
फायनान्स कंपनीकडून हप्ते थकीत असल्याचे फोन येऊ लागल्यानंतर महिलांना धक्का बसला. चौकशी केली असता युनूस सुतार घर सोडून पैसे घेऊन फरार झाल्याचे समोर आले.

या घटनेमुळे संबंधित महिलांमध्ये भीती व संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, अनेक महिलांवर आर्थिक संकट ओढवले आहे. आमचा विश्वासघात झाला असून न्याय मिळावा, अशी मागणी महिलांनी केली आहे. याबाबत हसीना बादशाह शेख, तहसीन सूरज इनामदार, मिनाज फिरोज इनामदार, निलोफर मन्सूर सुतार, आसमा मोसीन शेख, सलमा मीरासाहेब सुतार, ईशा रफिक शेख, भारती रामचंद्र पवार आणि हवाबी अमीन सुतार यांनी स्वाक्षरीनिशी तक्रार अर्ज उंब्रज पोलीस ठाण्यात दिला आहे.

Advertisement
Tags :

.