For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

‘गॅरंटीं’मुळे सध्या कर्जमाफी शक्य नाही

06:40 AM Oct 19, 2026 IST | Tarun Bharat Portal
‘गॅरंटीं’मुळे सध्या कर्जमाफी शक्य नाही
Advertisement

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बी. के. हरिप्रसाद : शेतकऱ्यांना आवश्यक मदत करण्यास कटिबद्ध

Advertisement

त. भा. प्रतिनिधी/ बेंगळूर

राज्यातील गॅरंटी योजनांमुळे सध्या कर्जमाफी करणे शक्मय नाही. मात्र, दुष्काळामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत सरकारकडून केली जाईल, असे आश्वासन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बी. के. हरिप्रसाद यांनी दिले. रविवारी कलबुर्गी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

Advertisement

राज्यात तिसरे मुख्यमंत्री येतील, असे भाजप प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांनी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना हरिप्रसाद यांनी, विजयेंद्र यांना दिवसाढवळ्या स्वप्न पडत आहे. काँग्रेसचे 25 आमदार दुसऱ्या पक्षात प्रवेश करणार असल्याचा त्यांचा दावाही असाच आहे. सीजेपीला काँग्रेसकडून आर्थिक मदत दिली जात असल्याच्या विजयेंद्र यांच्या आरोपांचेही त्यांनी खंडन केले.

निधी मिळविणे आणि आरटीजीएसच्या माध्यमातून लाच घेण्याच्या विषयांची विजयेंद्र यांना चांगलीच माहिती आहे. तऊणांना तुऊंगात जावे लागल्यास त्यांना कायदेशीर मदत देऊ, असे आपण म्हटले होते. मात्र, या मदतीला आर्थिक निधी पुरविणे असे म्हणता येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या भेटीसंदर्भात माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी केलेल्या विधानावरही हरिप्रसाद यांनी प्रतिक्रिया दिली. कुमारस्वामी यांना उपग्रहाद्वारे या भेटीची माहिती मिळते का, असा सवाल करत राजकीय नेत्यांनी एकमेकांची भेट घेणे सामान्य बाब आहे. मात्र, आमदार आणि खासदारांच्या वैयक्तिक बाबींवर आपण भाष्य करणार नसल्याचेही ते म्हणाले.

Advertisement
Tags :

.