महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

लालकृष्ण अडवाणी पुन्हा इस्पितळात दाखल

06:22 AM Jul 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

दिल्लीतील अपोलो रुग्णालयात उपचार

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना पुन्हा इस्पितळात दाखल करण्यात आले. 96 वषीय लालकृष्ण अडवाणी यांना बुधवारी रात्रीपासून डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास त्यांना दिल्लीतील अपोलो रुग्णालयात अॅडमिट करण्यात आले. गेल्या आठवड्यातच त्यांच्यावर नवी दिल्लीच्या ‘एम्स’मध्ये दाखल करण्यात आले होते. रात्रभर करण्यात आलेल्या उपचारानंतर गुरुवारी त्यांना एम्सच्या खासगी वॉर्डमधून डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना फॉलोअपसाठी येण्याचा सल्ला दिला होता. आता पुन्हा त्यांची प्रकृती खालावल्यामुळे इस्पितळात उपचार सुरू करण्यात आले आहेत.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article