महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

छोट्या ड्रॅगनप्रमाणे दिसणारी पाल

06:21 AM Aug 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

जगात हैराण करणाऱ्या प्राण्यांमध्ये साप आणि पालीच्या प्रजाती सामील असतात. तसेच डायनासोरबद्दल सर्वाधिक कुतुहूल असते, परंतु हा प्राणी आता अस्तित्वात नाही. परंतु अनेक प्रकारच्या पाली एखाद्या ड्रॅगनप्रमाणे दिसतात. तसेच या पालीचे नाव थॉर्नी ड्रॅगन आहे.

Advertisement

थॉर्नी डेव्हिल मध्य ऑस्ट्रेलियाच्या शुष्क झाडीदार भूमी आणि वाळवंटात राहतो. त्याच्या शरीराचा वरील हिस्स्यात काटे असतात. अशास्थितीत शिकारी प्राणी त्याला चावू शकत नाही तसेच गिळूही शकत नाही. ही संरचना पाहून डायनासोर स्वत:च्या युगातून परत आल्याचे वाटते किंवा एखाद्या भयावह ड्रॅगनचा आकार छोटा झाल्याचे वाटू शकते.

Advertisement

थॉर्नी डेव्हिलकडे बारकाईने पाहिल्यास त्याच्या मानेजवळ आणखी एक शीर असल्याचे वाटते. मानेच्या मागील या संरचनेला ‘फॉल्स हेड’ म्हटले जाते. ही संरचना अत्यंत सॉफ्ट टिश्यूने तयार झालेली असते. यामुळे त्याला शिकाऱ्यांपासून स्वत:चे शीर वाचविण्यास मदत मिळते. हा मोठा हिस्सा त्याच्या कण्याचा हिस्सा असतो.

थॉर्नी डेव्हिल रंग बदलण्यात देखील सक्षम आहे. उन्हाळ्यात या पाली सर्वसाधारणपणे हलक्या पिवळ्या आणि लाल रंगाच्या असतात, तर थंडीच्या काळात त्या वेगाने गडद रंगात बदलून जातात. सूर्य उगवताच त्या दररोज या रंगात बदल करतात आणि अधिक सक्रीय होतात. थंड सकाळी त्यांना करडा रंग प्राप्त होतो. तर तापमान वाढल्यास त्याचा रंग फिकट होत जातो.

थॉर्नी डेव्हिल केवळ मुंग्यांना फस्त करतात. एक दिवसात हजारो मुंग्या त्या खात असतात. स्वत:च्या शिकारीची बसून प्रतीक्षा त्यांच्याकडून केली जाते. मुंग्यांच्या मार्गानजीक एक भोजनस्थळ निवडतात आणि स्वत:ची शिकार तेथून जाऊ लागल्यावर मुंग्यांना पकडण्यासाठी स्वत:च्या जीभेचा वापर करतात.

शिकाऱ्यांपासून वाचण्यासाठी थॉर्नी डेव्हिलची सुरक्षा व्यवस्था अत्यंत आकर्षक असते. त्यांच्या शरीराची संरचना यात मदत करते, याचबरोबर त्या स्वत:च्या छातीला हवेने फुगवून घेतात, यामुळे त्यांच्या शरीराचा आकार मोठा होतो आणि शिकाऱ्यांना थॉर्नी डेव्हिलला गिळणे अवघड ठरते.

या प्राण्याच्या त्वचेवर छोटे चॅनेल असतात, जे पाणी जमा करणे आणि त्याला पिण्यासाठी कुठल्याही मदतीशिवाय स्वत:च्या तोंडात पोहोचण्यास सक्षम करतात. ते अनेकदा दवामुळे भिजलेल्या स्थितीतून जातात किंवा केवळ पावसाच्या पाण्याची प्रतीक्षा करतात. हे पाणी ते स्वत:च्या पाठीवर पडू देतात, जे तेथून त्यांच्या तोंडात पोहोचते.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article