For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बेळगावहून नेलेल्या यकृताचे बेंगळूरमध्ये रोपण

11:10 AM Nov 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
बेळगावहून नेलेल्या यकृताचे बेंगळूरमध्ये रोपण
Advertisement

बेळगाव : बेळगावच्या एका 16 वर्षीय मुलाच्या कुटुंबीयांनी घेतलेल्या धाडसी निर्णयामुळे त्याच्या यकृताचे रोपण बेंगळूर येथील स्पर्श हॉस्पिटलमध्ये एका 63 वर्षीय रुग्णावर करण्यात आले. केएलई हॉस्पिटलमधून सकाळी 6.30 वाजता सदर यकृत घेऊन डॉक्टर व कर्मचारी हुबळी विमानतळावर सकाळी 7.40 वाजता पोहोचले. तेथून बेंगळूरला 9.35 मिनिटांनी पोहोचले. याठिकाणी त्या रुग्णावर यकृत रोपण करण्यात आले. यासाठी कर्नाटक स्टेट ऑर्गन अॅण्ड टिश्यू ट्रान्स्प्लांट ऑर्गनायझेशन (सोटो) व पोलीस खात्याने बेंगळूर येथे ग्रीन क्वॉरिडॉर तयार केले होते. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नामुळे एका रुग्णावर यकृत रोपण करण्यात आले. त्याला जीवदान देण्यात आले. याबद्दल स्पर्शचे चेअरमन डॉ. शरण शिवराज पाटील यांनी सोटो, पोलीस दल, इंडिगो एअर लाईन या सर्वांचे आभार मानले.

Advertisement

Advertisement
Tags :

.