For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

''मला शिकायचंय, कलेक्टर बनायचंय; आमदार काका रस्ता चांगला करा ना....तुमची लाडकी पुतणी म्हणून नम्र विनंती'', चिमुकल्या विद्यार्थीनीचे पत्र

10:59 AM Oct 24, 2026 IST | Tarun Bharat Portal
  मला शिकायचंय  कलेक्टर बनायचंय  आमदार काका रस्ता चांगला करा ना    तुमची लाडकी पुतणी म्हणून नम्र विनंती    चिमुकल्या विद्यार्थीनीचे पत्र
Advertisement

कुरुंदवाड (कोल्हापूर): मला खूप शिकायचे आहे, मोठी होऊन कलेक्टर बनायचे आहे.... पण शाळेत जाणाऱ्या रस्त्यावर इतके खड्डे पडले आहेत की दररोज जीव मुठीत धरून सायकल चालवावी लागते. अशा शब्दांत आपली व्यथा एका चिमुकल्या विद्यार्थीनीने पत्रातूत आमदारांपर्यंत पोहोचवली आहे. राजापूर-खिद्रापूर हायस्कूल, राजापूरवाडी (ता. शिरोळ) येथील इयत्ता ७ वीत शिकणाऱ्या बुशरा युनूस खोंदू या शाळकरी विद्यार्थिनीने आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना पत्र लिहून रस्ता दुरुस्त करण्याची आग्रही विनंती केली आहे.

Advertisement

राजापूर गावापासून राजापूरवाडी येथील शाळेपर्यंतचे अंतर दोन किलोमीटर आहे. यातील एक किमी रस्ता चांगला असला, तरी उर्वरित रस्त्याची पूर्णपणे चाळण झाली आहे. संपूर्ण रस्त्यावर मोठे खड्डे आणि चिखल साचल्याने हा एकेरी मार्ग अत्यंत धोकादायक बनला आहे. आपली समस्या सांगताना बुशरा हिने पत्रात लिहिले आहे की, मी आणि माझा भाऊ सायकलवरून शाळेला जाताना ४ ते ५ वेळा पडलो आहोत. या अपघातात माझ्या भावाचा हातही मोडला आहे.

माझ्यासारख्या अनेक विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. राजापूर ते राजापूरवाडी या मार्गावरून दररोज विद्यार्थी, नागरिक आणि एसटी बसची ये-जा सुरू असते. मात्र, रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहने चालवणे आणि पायी चालणेही कठीण झाले आहे. बुशराने पत्राच्या शेवटी भावूक होऊन लिहिले आहे, आमदार काका, तुम्ही स्वतः या रस्त्यासंदर्भात चर्चा करून हा प्रश्न त्वरित मार्गी लावावा आणि पाठपुरावा करून रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करून द्यावा, तुमची लाडकी पुतणी म्हणून नम्र विनंती असा उल्लेख केला आहे.

Advertisement

Advertisement

.