कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कोमसापचे संमेलन साहित्य मेजवानी ठरेल : आ. दीपक केसरकर

05:21 PM Mar 09, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

सावंतवाडीत २२ मार्चला साहित्य संमेलन

Advertisement

सावंतवाडी | प्रतिनिधी

Advertisement

संस्थानकालीन सावंतवाडी शहरात कोकण मराठी साहित्य परिषदेचे साहित्य संमेलन होत आहे. हे संमेलन म्हणजे एक वेगळीच साहित्य मेजवानी ठरणार आहे.पर्यटन जिल्ह्यामध्ये साहित्य, सांस्कृतिक चळवळ अधिक व्यापकतेने वाढावी या दृष्टीने सांस्कृतिक ,साहित्यिक मंडळे प्रयत्न करत आहेत. या संमेलनाचा साहित्यप्रेमी ,लेखक, मराठी भाषाप्रेमी तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा आमदार दीपक केसरकर यांनी केले आहे . तसेच या साहित्य संमेलनासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन देऊन त्यांनी आर्थिक मदतही केली आहे. येत्या २२ मार्च रोजी सावंतवाडी येथील बॅरिस्टर नाथ पै येथे हे साहित्य संमेलन होणार असून त्या संदर्भात नियोजनाची बैठक घेण्यात आली यावेळी केसरकर यांचे कोमसापच्या सदस्यांनी स्वागत केले यावेळी केसरकर बोलत होते . यावेळी कोमसापचे जिल्हाध्यक्ष मंगेश मस्के, तालुकाध्यक्ष. ॲड संतोष सावंत, जिल्हा सचिव विठ्ठल कदम ,खजिनदार भरत गावडे, तालुका उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे ,सहसचिव राजू तावडे, दीपक पटेकर, प्रा. सुभाष गोवेकर , विनायक गावस आदी उपस्थित होते .केसरकर पुढे म्हणाले , कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मधु मंगेश कर्णिक हे या संमेलनाला येणार असल्याने हे साहित्य संमेलन एक दर्जेदार संमेलन ठरणार आहे . या संमेलनाला अध्यक्ष म्हणून वस्त्रहरण नाटकाचे लेखक गंगाराम गवाणकर लाभले आहेत.सावंतवाडी नगरीत साहित्य संमेलन होत आहे त्यामुळे हे संमेलन दर्जेदार व्हायला हवे. त्या दृष्टीने योग्य नियोजन करा. विविध समित्या गठीत करा. या संमेलनामध्ये सर्वांना सामावून घ्या असे स्पष्ट केले.

ॲड संतोष सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत साहित्य संमेलनासंदर्भात चर्चा झाली. कित्येक वर्षानंतर सावंतवाडीत प्रथमच हे साहित्य संमेलन होत आहे. पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज साहित्य नगरी असे या साहित्य संमेलनाला नाव देण्याचे ठरले. तसेच या साहित्य संमेलनासाठी जिल्हास्तरावरून विविध समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. या समित्यांमध्ये मुख्य संयोजन समिती ,प्रसिद्धी समिती ,सांस्कृतिक समिती, ग्रंथदिंडी समिती, निधी संकलन समिती, व्यासपीठ व्यवस्था समिती, स्वागत समिती ,भोजन व्यवस्था समिती, प्रकाशन समिती, ग्रंथ प्रदर्शन समिती , वाहतूक व्यवस्था समिती, आधी विविध समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. या समितीत कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखाचे कार्यकारणी सदस्य तसेच अन्य आजीव सदस्य त्याचबरोबर सावंतवाडी तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी , कार्यकर्ते यांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच जिल्हास्तरावरील कोकण मराठी साहित्य परिषदेचे सक्रिय तालुका अध्यक्ष सचिव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी तालुकाध्यक्ष ॲड संतोष सावंत ,सहसचिव राजू तावडे ,उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे, जिल्हा सचिव विठ्ठल कदम, खजिनदार भरत गावडे ,एडवोकेट नकुल पार्सेकर ,प्रज्ञा मातोंडकर ,ऋतुजा सावंत भोसले., दीपक पटेकर विनायक गावस ,रुपेश पाटील आदी उपस्थित होते.

Advertisement
Tags :
# tarun bharat sindhudurg # news update # konkan update # sawantwadi # deepak kesarkar # Literature conference
Next Article