महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

महेश काळे यांच्या स्वरयात्रेने श्रोते तृप्त..!

01:03 PM Dec 04, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सिद्धनाथ स्पंदन ठरले यादगार : रंगमृदंगही रंगला

Advertisement

फोंडा : बोरीच्या सिद्धनाथ पर्वत शिखरावरील मंदिराचा परिसर श्रोत्यांनी खचाकच भरलेला...सर्वांचे कान व ध्यान आजच्या घडीचे आघाडीचे गायक महेश काळे यांच्या गायनाकडे लागलेले. भूप रागातील ‘महादेव देव महेश्वरा’ या बंदिशीने त्यांनी आपल्या  मैफलीची सुऊवात केली. पुढे यमन रागाला जोडूनच नाट्यागीते व भक्तीगीते अशी  मैफलीची उंची गाठत तब्बल दोन तास श्रोत्यांना ध्यानमग्न कऊन सोडले. मुद्रा प्रतिष्ठानच्या सिद्धनाथ स्पंदन पर्व सहामध्ये विख्यात गायक महेश काळे यांच्या स्वरयात्रेसह ‘रंगमृदंग’ या प्रताप पाटील, कुणाल व भक्तराज पाटील यांच्या पखवाज वादनाच्या दुहेरी मैफली झाल्या. शनिवारी सायंकाळी महेश काळे यांना ऐकण्यासाठी सिद्धनाथवर मोठ्यासंख्येने श्रोतावर्ग पोचला व अपेक्षेप्रमाणे एका अपूर्व अशा संगीत मैफलीने तृप्त झाला. महेश काळे यांनी भूप रागातील बंदीशीतून शिवआराधना करतानाच आपले लोकप्रिय असे ‘मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया’ हे भक्तीगीत व त्याच्या जोडीलाच ‘सूर निरागस...हो...! गीत विविध अंगांनी आळविले. यमन रागात पारंपरिक बंदीश आळवताना देवा घरचे ज्ञात कुणाला, हे सुरांनो चंद्र व्हा, नाथ हा माझा ही अजरामर नाट्यागीते गाऊन मैफलीची रंगत वाढवत नेली. भैरवीकडे वळताना ‘कानडा राजा पंढरीचा’ हा अभंग शेवटी त्यांनी स्वत: संगीतबद्ध केलेली साने गुऊजींची ‘खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे’ ही प्रार्थना सादर केली.

Advertisement

त्यांना तबल्यावर विभव खांडोळकर, ऑर्गनवर दत्तराज सुर्लकर, संवादिनीवर दत्तराज म्हाळशी, व्हायोलीनवर अपूर्व गोखले, पखवाजवर प्रथमेश, मंजीरीवर राहूल खांडोळकर, तसेच तानपुऱ्यावर चैतन्य पाठक, अऊंधती वसिष्ट, जतीन च्यारी व विद्यानंद गांवस या कलाकारांनी साथसंगत केली. ‘रंगमृदंग’ या सत्रात विख्यात पखवाजवादक प्रताप पाटील, कुणाल पाटील व भक्तराज पाटील यांचे अप्रतिम व तेवढेच दमदार मृदंग वादन श्रोत्यांना भावले. शिवतांडव मृंदगावर वाजविताना त्यांनी आपल्या जादुई बोटांनी या तालवाद्याला बोलके केले. चक्रधार व काही तुकडे तसेच मिश्र वादनाने तासभर त्यांनी  श्रोत्यांना खिळवून ठेवले. त्यांना नगमासाथ आकाश नाईक यांनी केले.

कार्यक्रमाचे उद्घाटन पर्यटन महामंडळाचे अध्यक्ष आमदार डॉ. गणेश गांवकर यांच्याहस्ते झाले. यावेळी तऊण भारतचे निवासी संपादक सागर जावडेकर, श्री नवदुर्गा देवस्थानचे अध्यक्ष श्याम प्रभूदेसाई व मुद्रा प्रतिष्ठानचे प्रमुख मिलिंद पैदरकर हे उपस्थित होते. गोव्याचे खरे सौंदर्य व पर्यटन ग्रामीण भागातच आहे व त्याला चालना देण्यासाठी असे उपक्रम आवश्यक असल्याचे गणेश गांवकर म्हणाले.  स्पंदन हे कलाकार व श्रोत्यांना उर्जा देणारे असून हा सांस्कृतिक माहोल असाच टिकवून ठेवण्याचे आवाहन सागर जावडेकर यांनी केले. सिद्धनाथ स्पंदन या संकल्पनेविषयी बोलताना मुद्रा प्रतिष्ठानचे प्रमुख मिलिंद पैदरकर म्हणाले, गोव्याची ओळख जगभर समुद्र किनारे, संगीत रजनी व मौजमजा अशीच झाली आहे. गोव्यातील अंतर्गत भागत समृद्ध असे निसर्ग पर्यटन दडलेले आहे. सिद्धनाथ पर्वतासारखी स्थळे जागतिक वासरा स्थळे म्हणून जगभर पोचावीत हा त्यामागील प्रयत्न आहे. श्याम प्रभूदेसाई यांनी श्री सिद्धनाथ पर्वत, मंदिराची परंपरा व या परिसराचे महत्म्य सांगितले. गोविंद भगत यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article