टोलीन्स टायर्स, क्रॉस लिमिटेडचे आयपीओ सुचीबद्ध
सपाट स्तरावर समभाग सुचीबद्ध : टोलीन समभाग226, क्रॉस लिमिटेडचा 240 वर सुचीबद्ध
वृत्तसंस्था/ मुंबई
टोलिन टायरचे समभाग शेअर बाजारात सोमवारी सपाट स्तरावर सूचीबद्ध झाले आहेत. टोलिन टायर्सच्या समभागाची इशूची किंमत 226 रुपये प्रति समभाग अशी ठेवण्यात आली होती. बीएसईवर हा समभाग 227 रुपये प्रति समभाग या भावावर सुचीबद्ध झाला होता तर एनएसईवर हाच समभाग 228 प्रति समभाग याप्रमाणे सुचीबद्ध झाला.
आयपीओच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या रकमेचा वापर कंपनी आपली सहकारी कंपनी टोलीन रबर्समध्ये गुंतवणुकीसाठी करणार असून त्याचप्रमाणे छोट्या व दीर्घकालीन अवधीसाठीच्या कर्जाचीही परतफेड करण्यासाठी रक्कम वापरली जाणार आहे. आयपीओ 9 ते 11 सप्टेंबर यादरम्यान गुंतवणूकीसाठी खुला झाला होता, ज्याला गुंतवणूकदारांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. आयपीओ लॉन्च होण्याच्या आधीच अँकर गुंतवणूकदारानी 69 कोटी रुपयांची उभारणी केली होती.
क्रॉस लिमिटेडचा समभागही लिस्ट
याचदरम्यान क्रॉस लिमिटेड यांचाही आयपीओ सोमवारी शेअर बाजारात सपाट स्तरावर सूचीबद्ध झाला. बीएसई आणि एनएसईवर पाहता कंपनीचा समभाग 240 रुपये प्रति समभाग याप्रमाणे सूचीबद्ध झाला होता. कंपनीने या समभागाची इशू किंमत 240 रुपये प्रति समभाग अशी ठेवली होती. या आयपीओच्या माध्यमातून उभारण्यात आलेली रक्कम कंपनी मशीनरी आणि इक्विपमेंट खरेदीसाठी करणार आहे. याचप्रमाणे बँका आणि इतर वित्तीय संस्थांकडून घेतलेले कर्जही टप्प्याटप्प्याने कंपनी या निधीच्या माध्यमातून कमी करत जाणार आहे. 9 ते 11 सप्टेंबर पर्यंत हा आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला होता. 228 ते 240 रुपये प्रति समभाग अशी इशू किंमत ठेवण्यात आली. समभाग 17.66 पट इतका आयपीओ सबक्राईब झाला होता.