For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ऑलिम्पिक चाचण्यांसाठी नेमबाजांची यादी जाहीर

06:41 AM Mar 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
ऑलिम्पिक चाचण्यांसाठी नेमबाजांची यादी जाहीर
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडियाने नवी दिल्ली आणि भोपाळ येथे होणार असलेल्या ऑलिम्पिक नेमबाजी चाचण्यांमध्ये भाग घेणाऱ्या पिस्तूल आणि रायफल नेमबाजांची यादी प्रसिद्ध केली आहे. या चाचण्यांमध्ये ऑलिम्पिक कोटा विजेते देशातील अव्वल क्रमांकांच्या नेमबाजांशी स्पर्धा करतील.

चार चाचण्यांची ही शृंखला असेल. पण पहिल्या तीन चाचण्यांतील गुणसंख्या विचारात घेतली जाईल. पहिले दोन टप्पे 18 ते 27 एप्रिलदरम्यान नवी दिल्लीतील डॉ. करणी सिंग शूटिंग रेंजमध्ये होणार आहेत. चाचण्यांचा तिसरा आणि चौथा टप्पा 10 ते 19 मेदरम्यान एमपी शूटिंग अॅकॅडमीमध्ये होणार आहे. या यादीत एअर पिस्तूल महिला गटातील नेमबाजांचा उल्लेख नाही.

Advertisement

ज्या एअर पिस्तूल आणि एअर रायफल नेमबाजांनी ऑलिम्पिक कोटा स्थान मिळवले आहे त्यांना एक बोनस गुण मिळेल. परंतु 50 मीटर रायफल आणि 25 मीटर पिस्तूल स्पर्धांच्या बाबतीत ऑलिम्पिक कोटा विजेत्यांच्या गुणांमध्ये दोन बोनस गुण जोडले जातील. भारताने आतापर्यंत नेमबाजीत विक्रमी 19 ऑलिम्पिक जागा मिळविल्या आहेत.

नेमबाजांची यादी पुढीलप्रमाणे : 10 मीटर एअर पिस्तूल पुऊष : सरबज्योत सिंग, अर्जुनसिंह चीमा, वऊण तोमर, नवीन आणि रविंदर सिंग. 10 मीटर एअर रायफल पुऊष : दिव्यांश सिंह पनवार, अर्जुन बबुता, ऊद्रांक्ष पाटील, कार्तिक साबरी राज आणि संदीप सिंग, महिला : मेहुली घोष, रमिता, तिलोत्तमा सेन, इलावेनिल वलरिवन आणि नॅन्सी.

25 मीटर रॅपिड फायर पुऊष : विजयवीर सिद्धू, अनीश, आदर्श सिंग, भावेश शेखावत आणि अंकुर गोयल. 25 मीटर स्पोर्ट्स पिस्तूल महिला : रिदम सांगवान, ईशा सिंग, मनू भाकर, अभिज्ञा पाटील आणि सिमरनप्रीत कौर ब्रार. 50 मीटर रायफल थ्रीपी पुऊष : ऐश्वर्य प्रताप सिंह तोमर, स्वप्नील कुसाळे, अखिल शेओरान, चैन सिंग आणि नीरज कुमार, महिला : सिफ्ट कौर सामरा, आशी चौक्सी, श्रीयांका सदनगी, निश्चल आणि अंजुम मोदगील.

Advertisement
Tags :

.