महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

हॉकी शिबिरासाठी संभाव्य कोअर ग्रुपची यादी जाहीर,

06:46 AM Jul 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी बेंगळूरमध्ये शिबिराचे आयोजन

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

हॉकी इंडियाने बेंगळूरमध्ये होणाऱ्या वरिष्ठ पुरुषांच्या राष्ट्रीय हॉकी शिबिरासाठी संभाव्य खेळाडूंची मंगळवारी घोषणा केली असून येत्या सप्टेंबरमध्ये चीनमध्ये होणाऱ्या आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेच्या तयारीसाठी हे शिबीर आयोजित करण्यात आले आहे.

जाहीर करण्यात आलेल्या कोअर ग्रुपमधील यादीत पॅरिस ऑलिम्पिकसाठी निवडण्यात न आलेल्या खेळाडूंचा समावेश आहे. याशिवाय डेव्हलपमेंट ग्रुप व ज्युनियर पुरुष हॉकी संघातील खेळाडूंनाही त्यात स्थान मिळाले आहे. ऑलिम्पिकसाठी निवडलेला संघ सध्या सुरू असलेल्या राष्ट्रीय शिबिरात ब्रेकनंतर 24 ऑगस्ट रोजी पुन्हा दाखल होणार आहे. 4 सप्टेंबर रोजी हे प्रशिक्षण शिबीर संपणार आहे.

राष्ट्रीय शिबिरासाठी बोलावण्यात आलेल्या खेळाडूंत गोलरक्षक सुरज करकेटा, मोहित एचएस, डिफेंडर्स वरुण कुमार अमिर अली, अमनदीप लाक्रा, रोहित, सुखविंदर व योगेम्बर रावत, मिडफिल्डर्स रबिचंद्र सिंग मोइरंगथेम, मोहम्मद राहील मौसीन, विष्णुकांत सिंग, रजिंदर सिंग, अंकित पाल, पूवन्ना सीबी, रोशन कुजुर यांचा समावेश आहे. आघाडीवीरांमध्ये मनींदर सिंग, कार्ती एस. अरायजीत सिंग हुंडाल, बॉबी सिंग धामी, उत्तम सिंग, गुरजोत सिंग यांना स्थान मिळाले आहे.

‘आपला वरिष्ठ संघ ऑलिम्पिकची तयारी करीत असून राष्ट्रीय संघात स्थान मिळविण्यास उत्सुक असणाऱ्या अनेक प्रतिभावान व उभरत्या खेळाडूंचा संच आपल्याकडे आहे. ते संधी मिळण्याची प्रतीक्षा करीत आहेत. पॅरिस ऑलिम्पिकनंतर काही आठवड्यातच आशियाई चॅम्पियनस ट्रॉफी स्पर्धा होणार असल्याने त्याची तयारी याआधीच सुरू झाली आहे. बेंगळूरमध्ये राष्ट्रीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व खेळाडू चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी एकत्रित तयारी करणार असून भारत या स्पर्धेचा विद्यमान विजेता आहे. ऑलिम्पिक संघ या शिबिरात 24 ऑगस्ट रोजी दाखल होईल’, असे प्रमुख प्रशिक्षक क्रेग फुल्टन यांनी म्हटल्याचे हॉकी इंडियाने सांगितले.

हॉकी शिबिरासाठी निवडलेला हॉकीपटूंचा कोअर ग्रुप : गोलरक्षक-सुरज करकेटा, मोहित एचएस. डिफेंडर्स-वरुण कुमार, अमिर अली, अमनदीप लाक्रा, रोहित, सुखविंदर, योगेम्बर रावत. मिडफिल्डर्स-रबिचंद्र सिंग मोइरंगथेम, मोहम्मद राहील, मौसीन, विष्णुकांत सिंग, रजिंदर सिंग, अंकित पाल, पूवन्ना सीबी, रोशन कुजुर. आघाडीफळी-मनींदर सिंग, कार्ती एस. अरायजीत सिंग हुंडाल, बॉबी सिंग धामी, उत्तम सिंग, गुरजोत सिंग.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article