For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दुष्काळग्रस्त तालुक्यांची यादी वाढणार

06:54 AM Aug 31, 2026 IST | Tarun Bharat Portal
दुष्काळग्रस्त तालुक्यांची यादी वाढणार
Advertisement

उपमुख्यमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांची माहिती : राज्य सरकार विचारधीन

Advertisement

त. भा. प्रतिनिधी/ बेंगळूर

राज्यात दुष्काळाची परिस्थिती अधिक गंभीर होत असल्याच्या पार्श्वभूमीवर दुष्काळग्रस्त तालुक्मयांची यादी वाढविण्याचा राज्य सरकार विचार करत आहे. सध्या 101 तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आले असून पुढील 15 दिवसांतील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर आणखी तालुक्मयांचा यादीत समावेश होण्याची शक्मयता आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री जी. परमेश्वर यांनी दिली. बेंगळुरात पत्रकारांशी ते बोलत होते.

Advertisement

सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात राज्यातील दुष्काळी परिस्थितीबाबत केंद्र सरकारकडे सविस्तर निवेदन सादर केले जाणार आहे. सध्या पिकांच्या नुकसानीचे सर्वेक्षण सुरू असून त्याच्या अहवालाच्या आधारे केंद्राकडे दुष्काळी मदतीची मागणी करण्यात येणार आहे. केंद्राची पथके राज्यात येऊन नुकसानीची पाहणी केल्यानंतर दुष्काळी मदत मंजूर होण्याची अपेक्षा आहे. शेतकऱ्यांना प्रतिएकर किती मदत द्यायची, याबाबत राज्य सरकार निर्णय घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

दुष्काळ निवारणासाठी केंद्राकडे वेळेत मदतीची मागणी

2023 मध्ये राज्याला दुष्काळामुळे सुमारे 39 हजार कोटी ऊपयांचे नुकसान झाले होते. त्यावेळी राज्य सरकारने केंद्राकडे 18 हजार कोटी ऊपयांच्या मदतीचा प्रस्ताव पाठवला होता. केंद्राकडून मदत मिळावी यासाठी दिल्ली येथे जाऊन आंदोलनही करण्यात आले होते. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळे 3,500 कोटी ऊपयांची मदत राज्याला मिळाली होती. यावेळी मात्र दुष्काळग्रस्त भागांना वेळेत मदत मिळावी, यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे आधीच मागणी केली आहे. दुष्काळ जाहीर करण्यासाठी केंद्राने निश्चित केलेल्या निकषांच्या आधारे मदतीसाठीचा प्रस्ताव तयार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.