For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विश्वविजेतेपदासाठी लिरेन - गुकेश लढत रंगणार सिंगापुरात

06:28 AM Jul 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
विश्वविजेतेपदासाठी लिरेन   गुकेश लढत रंगणार सिंगापुरात
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

डी. गुकेशचा विश्वविजेतेपदासाठीचा सामना मायदेशी व्हावा यासाठीचे भारताचे प्रयत्न निष्फळ ठरले असून सिंगापूरने दिल्ली आणि चेन्नईला मागे टाकत या महपत्त्वपूर्ण बुद्धिबळ लढतीचे यजमानपद प्राप्त केले आहे. त्यामध्ये इतिहासातील सर्वांत तरुण आव्हानवीर ठरलेल्या गुकेशकडून विद्यमान विजेत्या चीनच्या डिंग लिरेनला आव्हान दिले जाईल.

तामिळनाडू सरकार आणि ऑल इंडिया चेस फेडरेशन यांनी ‘फिडे’ या जागतिक बुद्धिबळ संघटनेला स्वतंत्र बोली सादर केल्या होत्या. 2.5 दशलक्ष डॉलर्सची बक्षीस रक्कम असलेला हा सामना यावर्षी 20 नोव्हेंबर ते 15 डिसेंबरदरम्यान होणार आहे. ‘बोलींचे पुनरावलोकन केल्यानंतर आणि सर्व संभाव्य यजमान शहरांची ठिकाणे, तेथील सुविधा, कार्यक्रम आणि संधी यांची पाहणी केल्यानंतर आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाने सिंगापूरला जागतिक विजेतेपदाच्या सामन्याचे यजमान म्हणून निवडले आहे’, असे ‘फिडेन’ने म्हटले आहे.

Advertisement

17 वर्षीय गुकेशने एप्रिलमध्ये कँडिडेट्स चेस टूर्नामेंट जिंकून इतिहास रचला होता आणि महान गॅरी कास्पारोव्हचा 40 वर्षे जुना विक्रम मोडीत काढत तो जागतिक विजेतेपदाचा सर्वांत तऊण आव्हानवीर बनला होता. ऑल इंडिया चेस फेडरेशन सचिव देव पटेल निराश झाले असले, तरी ते पूर्णपणे निराश झालेले नाहीत. आम्ही आमची सर्वोत्तम बोली लावली, पण कौल आमच्या बाजूने लागला नाही. आम्ही जिंकरणार याची शाश्वती नव्हती. पण आम्ही स्पर्धेला महत्त्व देतो, त्यामुळे ते ठीक आहे. भारताने दोन बोली सादर केल्या याचा आम्हाला आनंद आहे’, असे पटेल यांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.