महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

लिरेन - गुकेश लढतीच्या शर्यतीत सिंगापूर चेन्नईसह दिल्लीचीही उडी

06:33 AM Jun 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाने राष्ट्रीय राजधानीच्या बोलीला पाठिंबा दिल्यानंतर डी. गुकेश आणि चीनचा डिंग लिरेन यांच्यातील जागतिक विजेतेपदासाठीच्या सामन्याचे आयोजन करण्याच्या शर्यतीत चेन्नई आणि सिंगापूरसह दिल्लीनेही उडी घेतली आहे. बुद्धिबळ महासंघाने तामिळनाडू सरकारवर दक्षिणेकडील शहराचे नाव परस्पर पुढे केल्याचा आरोप केला आहे.

Advertisement

आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाचे (फिडे) मुख्य कार्यकारी अधिकारी एमिल सुतोव्हस्की यांनी शनिवारी सांगितले की, तिन्ही शहरांनी त्यांच्या बोली सादर केल्या आहेत आणि ही शहरे निकष पूर्ण करतात. या वर्षी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये होणाऱ्या सदर बहुप्रतीक्षित लढतीसाठी चेन्नईने प्रथम बोली लावली, तर नवी दिल्लीची बोली शेवटची राहिली, असे त्यांनी सांगितले.

आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाचे मंडळ या विषयावर पुढच्या आठवड्यात यावर चर्चा करेल. बोलीदारांच्या प्रतिनिधींना तपशील देण्यासाठी आणि प्रश्न विचारण्यासाठी आमंत्रित केले आहे. अंतिम निर्णय जूनमध्येच होईल, असे सुतोव्हस्की यांनी स्पष्ट केले आहे. चेन्नईची बोली तामिळनाडूच्या क्रीडा विकास प्राधिकरणाने, तर नवी दिल्लीसाठी बोली अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाने लावली आहे.

‘फिडे’ कोणत्याही सरकारला प्रतिष्ठित स्पर्धेसाठी बोली लावण्यापासून रोखत नाही. परंतु एकाच देशातील दोन संघटनांनी स्पर्धेसाठी बोली लावणे हे सहसा घडत नाही. एआयसीएफचे अध्यक्ष नितीन नारंग यांनी सांगितले की, राष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाने नवी दिल्लीसाठी बोली लावली आहे आणि भारत सरकारकडून त्यासाठी ना-हरकत दाखला घेण्यात आलेला आहे. तथापि, तामिळनाडू सरकारने फिडेकडे बोली पाठवण्यापूर्वी राष्ट्रीय महासंघाकडे सल्लामसलत केली नाही, असा आरोप त्यांनी केला.`

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews
Next Article