महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कणकुंबीजवळ 25 लाखाची दारू जप्त

12:08 PM Nov 25, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

आयशर वाहनात वेगळे कप्पे करून दारूची वाहतूक : 15 लाखाचे वाहन जप्त, बिहारच्या वाहनचालकाला अटक

Advertisement

बेळगाव : कणकुंबी (ता. खानापूर) तपास नाक्यावर शुक्रवारी पहाटे 25 लाखाची गोवा बनावटीची दारू जप्त करण्यात आली आहे. अबकारी अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली असून बिहारमधील वाहनचालकाला अटक करण्यात आली आहे. आयशर वाहनासह एकूण 40 लाख 200 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अबकारी विभागाचे अप्पर आयुक्त डॉ. वाय. मंजुनाथ, सहआयुक्त फिरोज खान किल्लेदार, उपायुक्त वनजाक्षी, दक्षिण विभागाचे अधीक्षक विजयकुमार हिरेमठ, रवि मुरगोड यांच्या मार्गदर्शनाखाली खानापूर विभागाचे अबकारी निरीक्षक मल्लेश उप्पार, बेळगाव उपविभागाचे मंजुनाथ गलगली व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे.

Advertisement

एमएच 05, एएम 0491 क्रमांकाच्या आयशर वाहनात वेगळे कप्पे करून 90 बॉक्स गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक करण्यात येत होती. कणकुंबीजवळ वाहन अडवून तपासणी केली असता सुरुवातीला या वाहनात काहीच आढळले नाही. मात्र, वेगळ्या कप्प्यातून बेकायदा दारू वाहतूक करण्यात येत असल्याचे लक्षात येताच अधिकाऱ्यांनी हे वाहन ताब्यात घेऊन बेळगावला आणले. सुबोध महतो (वय 49 रा. बंगाबाजार, बिहार) असे अटक केलेल्या वाहनचालकाचे नाव असून वाहनाच्या मालकाविरुद्धही एफआयआर दाखल करण्यात आला आहे. 90 बॉक्समध्ये 750 एमएलच्या व्हिस्कीच्या बाटल्यांची वाहतूक करण्यात येत होती. तर चार प्लास्टिक कॅनमधून 80 लिटर व्हिस्की वाहतूक करण्यात येत होती. याबरोबरच एका पिशवीतून व्हिस्कीच्या बाटल्यांना लावण्यात येणारे बूच अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आहेत. जप्त दारूची किंमत 25 लाख 200 रुपये तर वाहनाची किंमत 15 लाख रुपये इतकी होते.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article