कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मद्य तस्करीतील प्यादे जेरबंद, मास्टरमाईंड गायब

12:11 PM Mar 25, 2025 IST | Pooja Marathe
Advertisement

तोतया नितीन ढेरेला वरदहस्त कुणाचा - साखळी शोधण्याचे आवाहन

Advertisement

मोक्याचा प्रस्ताव लालफितीमध्येच

Advertisement

कोल्हापूरः आशिष आडिवरेकर

अंगावर खाकी वर्दी, वर्दीवर नेमप्लेट, डोक्यावर पोलिसाची टोपी मोटारीत अंबर दिवा ठेवून दारुची तस्करी करणाऱ्या नितीन ढेरेला राज्य उत्पादन शुल्क विभागाने जेरबंद केले. यानंतर नितीन हा फक्त प्यादे असून, मास्टरमाईंड अद्याप मोकाटच आहेत. कारवाई दाखविलीच तर ती केवळ आणी केवळ वाहन चालकापुरती दाखवायची आणि मॅनेज करायची असा प्रकार सध्या सुऊ आहे. यामुळे दारू तस्करीचे म्होरके मात्र नामानिराळेच राहत आहेत. त्यांच्यापर्यंत कारवाई पोहोचत नसल्याचे दिसत आहे.

राज्याच्या महसुलात भर टाकणाऱ्या मद्यावर गोवामेड दारूचा मोठा परिणाम होतो. दरवर्षी गोवा राज्यातून मोठ्या प्रमाणात दारूची तस्करी केली जात असल्याचे दिसून येते. राजस्थान, मध्य प्रदेशात जाणारे अनेक ट्रक, टेम्पोही कोल्हापुरातून पुढे जात असतात. मद्य तस्करांनी कोंबड्यांच्या पिंजऱ्याच्या मध्यभागी काही छुपे कप्पे तर औषध केमिकलच्या नावाखाली दारूची तस्करी मोठ्या प्रमाणात सुरू असते. काही वाहनांवर राज्य उत्पादन शुल्ककडून कारवाई केली जाते. मात्र काही वाहनांकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष केले जात आहे. याचसोबत राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई केवळ आणि केवळ चालकांपुरतीच मर्यादीत राहते. हे मद्य गोव्यातून कोल्हापूर जिल्ह्यात कोणासाठी आणले जाते, ते कोणत्या बार, हॉटेल किंवा परमिट रुमला जाणार होते याची चौकशी मात्र गुलदस्त्यातच राहते.

राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
एकूण गुन्हे - २२५७
अटक आरोपी - २१५२
वाहने जप्त - १६९
देशी दारू - ४ हजार २२१ लिटर
हातभट्टी - ३७ हजार ६९ लिटर
विदेशी दारू - १४ हजार १८८ लिटर
जप्त मुद्देमालाची किंमत - ६ कोटी २० लाख ६५ हजार ७३४ रुपये
वाहनांची किंमत - २ कोटी ३२ लाख २६ हजार २१० रुपये

वारस आणि बेवारस कारवायांचा अर्थपूर्ण खेळ
राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईमध्ये सध्या वारस आणि बेवारस कारवायांचा गोंडस खेळ सुरू आहे. वारस कारवायांमध्ये मद्याची वाहतूक करणारा चालक आणि त्याच्या पुढे असणाऱ्या पेट्रोलिंग वाहनातील त्याचे साथीदार यांच्यापुरतीच कारवाई दाखविली जात आहे. मात्र बेवारस कारवायांमध्ये वाहन चालकावरही कारवाई न करण्याचे अर्थपूर्ण धाडस उत्पादन शुल्क विभागाकडून सुरू आहे. बेवारस कारवाईमध्ये केवळ दारू आणि वाहन जप्त केले जाते.

मोकाचे प्रस्ताव लालफितीतच
राज्यसरकारने मद्य तस्करांवर मोका कारवाई करण्याच्या सुचना दिल्या आहेत. मात्र राज्य उत्पादन शुल्कची कारवाई केवळ वाहनधारकांपुरतीच मर्यादित आहे. वाहनधारकाला कोणी ही वाहतूक करण्यास सांगितली तसेच या मालाची ऑर्डर कोणी दिली याच्या मुळापर्यंत जाण्याचे धाडस राज्य उत्पादन शुल्क कधी दाखवणार की शासनाचा महसूल असाच बुडविला जाणार असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. मद्य तस्करी करून कोणत्या बारला किंवा कोणत्या हॉटेलला जाणार होते याचा पत्ताच राज्य उत्पादन शुल्कविभागाला लागत नाही.

ढेरेचे कारनामे
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत नितीन ढेरे याला अटक करण्यात आली आहे. या नितीनचे अनेक कारनामे समोर आले आहेत. राज्य उत्पादन शुल्कमधील अनेक अधिकाऱ्यांसोबत त्याची उठबस होती. अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वाहनावर तो चालक म्हणून काम करत होता. त्यांच्यासोबत त्यांचे लागेबांधे होते. आता नितीनवरच कारवाई करण्यात आल्यामुळे अधिकाऱ्यांनी आपले हात बाजूला केले आहेत.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article