For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

उत्खननात मिळाला मद्य कारखाना

01:28 PM May 29, 2026 IST | Tarun Bharat Portal
उत्खननात मिळाला मद्य कारखाना
Advertisement

पर्वतांच्या तळाला व्हायची मद्यनिर्मिती

Advertisement

स्कॉटलंडमधील दुर्गम पर्वत आणि खोल नाल्यांदरम्यान पुरातत्वतज्ञांनी एक असे रहस्य समोर आणले आहे, जे मागील 200 वर्षांपासून जगाच्या नजरेआड होते. पर्थशायरच्या ‘बेन लॉयर्स नॅशनल नेचर रिझर्व्ह’मध्ये उत्खननादरम्यान एका व्हिस्की डिस्टिलरीचे (मद्य कारखाना) अवशेष मिळाले आहेत. शुल्कापासून वाचण्यासाठी लोक गुपचूपपणे पर्वतांदरम्यान व्हिस्की तयार करत होते, अशा काळाची आठवण हा शोध करून देतो. या गुप्त ठिकाणावरून तांब्याच्या पात्राचा एक हिस्सा, दगडी संरचना आणि लाकडी स्तंभ हस्तगत झाले आहेत. हे एक बोथी म्हणजेच एक छोटीशी झोपडी होती, ज्याला विशेष स्वरुपात मद्य निर्माण करण्याच्या उपकरणांना लपविण्यासाठी तयार करण्यात आले होते, असे जाणकारांचे मानणे आहे.

1788 च्या अबकारी कायद्यानंतर छोट्या घरगुती उपकरणांवर बंदी घालण्यात आली होती, तेव्हा 18 व्या आणि 19 व्या शतकादरम्यान स्कॉटलंडमध्ये अवैध व्हिस्कीचा व्यापार शिगेला पोहोचला होता. नॅशनल ट्रस्ट फॉर स्कॉटलंडच्या पुरातत्व तज्ञांनुसार या कारखान्याला अत्यंत चलाखपणे ‘लॉयर्स बर्न’ नावाच्या झऱ्यानजीक एका अरुंद नाल्यात निर्माण करण्यात आले होते. झऱ्याला मिळालेले वळण याला वर आणि खालून दोन्ही बाजूने झाकोळणारे होते. उत्खननात दगडी फरशीखाली एक नाला, चूल आणि छताला जोडणारा स्तंभ मिळाला आहे. सर्वात रोमांचक शोध तांब्याच्या मिश्र धातूचा तुकडा असून तो मद्य निर्मिती यंत्राच्या दोन हिस्स्यांना जोडण्याचे काम करत होता.

Advertisement

हा शोध मद्यतस्कर आणि अबकारी अधिकाऱ्यांदरम्यान चालणाऱ्या बुद्धीयुद्धाचा साक्षीदार आहे. जर अधिकाऱ्यांनी या ठिकाणी छापा टाकला असता, तर त्यांनी पूर्ण उपकरणे नष्ट केली असती. परंतु तेथे तांब्याचा तुकडा मिळाल्याने तस्करांना अधिकाऱ्यांच्या कारवाईचा सुगावा लागल्याने ते घाईगडबडीत स्वत:ची सामग्री गुंडाळून तेथून पसार झाले असावेत. परंतु अफरातफरीत यंत्राचा छोटासा तुकडा तेथेच विसरून गेले असावेत. जो आज 200 वर्षांनंतर इतिहासाची साक्ष देतोय. त्या काळात पर्वतांमध्ये अवैध व्हिस्की तयार करणे केवळ व्यापार नाही, तर सरकारी कायद्यांच्या विरोधात ‘सामुदायिक प्रतिरोधा’ची एक पद्धत मानण्यात येत होते. तस्कर अत्यंत कमी सामग्रीसह प्रवास करायचे, जेणेकरून पकडले गेल्यास पुरावा मिळू नये. याचमुळे अशाप्रकारचे अवशेष मिळणे दुर्लभ असल्याचे पुरातत्व प्रमुख डेरेक अलेक्झेंडर यांनी सांगितले आहे.

अन्य शोध...

स्कॉटलंडमध्ये 2008 साली ग्लेन एफ्रिक येथे एका छोट्या इमारतीचा पाया आढळून आला. ज्याला नंतर राष्ट्रीय महत्त्वाचे स्मारक घोषित करण्यात आले. लोमोंड नॅशनल पार्कमध्ये दोन जुन्या फार्मस्टेडची ओळख अवैध डिस्टिलरीच्या स्वरुपात करण्यात आली होती. बेन लॉयर्स रिझर्व्हमध्ये आतापर्यंत 5 अशी ठिकाणं मिळाली आहेत. परंतु पहिल्यांदाच  व्हिस्की स्टिलचा वास्तविक हिस्सा प्राप्त झाला आहे.

Advertisement
Tags :

.