Umarga | उमरगा उपजिल्हा रुग्णालयात दारूच्या बाटल्यांचा खच! आमदार प्रवीण स्वामी यांनी प्रशासनाला झाप झापले!
उमरगा उपजिल्हा रुग्णालय परिसरात आढळल्या देशी दारूच्या बाटल्या
धाराशिव उमरगा - उमरगा उपजिल्हा रुग्णालय परिसरात आढळल्या देशी दारूच्या बाटल्या,तर रुग्णालय परिसरात अस्वच्छता आमदार प्रवीण स्वामी यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले सिटी स्कैन मशीन उद्घाटन साठी आमदार प्रवीण स्वामी उपजिल्हा रुग्णालात गेले होते दरम्यान त्यांनी रुग्णालय परिसराची पाहणी केली तेंव्हा दारूच्या बाटल्या आढळून आल्या व त्यावर प्रवीण स्वामी यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले..
गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयातील वॉर्ड, कॉरिडॉर आणि स्वच्छतागृहांमध्ये घाण साचल्याच्या तक्रारी होत्या. भिंतींवर गुटखा, तंबाखू आणि पानमसाल्याच्या पिचकाऱ्या मारलेल्या दिसत होते. अनेक ठिकाणी कचरा साचलेला होता. यामुळे रुग्णांच्या आरोग्यावर धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याशिवाय, सर्वात धक्कादायक बाब म्हणजे रुग्णालयाच्या परिसरात रिकाम्या देशी दारूच्या बाटल्या आढळून आल्या. रुग्णालयासारख्या संवेदनशील ठिकाणी अशा प्रकारे दारूच्या बाटल्या आढळणे गंभीर बाब मानली जात आहे. त्यामुळे रुग्णालयाच्या सुरक्षेवर आणि प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.