महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बसरीकट्टी अंगणवाडी आवारात दारुच्या बाटल्या टाकण्याचे प्रकार

11:20 AM Sep 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मद्यपींचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी

Advertisement

वार्ताहर/सांबरा

Advertisement

बसरीकट्टी (ता. बेळगाव) येथील अंगणवाडी केंद्रामध्ये दररोज दारू ढोसून तेथे रिकाम्या बाटल्या टाकून जाण्याचा प्रकार सुरू आहे. सदर प्रकार वारंवार घडत असून अंगणवाडी केंद्र परिसरात दारू ढोसणाऱ्या मद्यपींचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांतून होऊ लागली आहे. गावातील लक्ष्मी कट्टा जवळील अंगणवाडी केंद्रामध्ये रात्रीच्या वेळी दररोज  दारू ढोसून तेथेच रिकाम्या बाटल्या टाकून जाण्याचा प्रकार घडत आहे. तसेच गुटखा खाऊन तेथेच थुंकणे असे प्रकारेही घडत आहेत.सदर प्रकार अंगणवाडी सेविकांनी ग्रामपंचायत सदस्यांच्या निदर्शनास आणून दिला आहे व असे प्रकार वारंवार घडत असल्याने ग्रामस्थांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. मद्यपिंनी आता अंगणवाडी केंद्रांना आपला अड्डा बनविला असल्याने दारू ढोसणाऱ्या मद्यपींवर कारवाई करावी अशी मागणी सध्या जोर धरू लागली आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article