For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यात रंगोत्सवानुसार दारूबंदीचा आदेश

10:55 AM Mar 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यात रंगोत्सवानुसार दारूबंदीचा आदेश
Advertisement

बेळगाव : होळी व रंगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यात मद्यविक्री बंदीचा आदेश जारी करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी हा आदेश जारी केला असून या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कर्नाटक अबकारी कायद्यांतर्गत कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. वेगवेगळ्या पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात वेगवेगळ्या तारखेला रंगोत्सव साजरा केला जातो. त्यामुळे ही गोष्ट लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी रंगोत्सवाच्या वेळेत दोन ते तीन दिवस दारूविक्री बंदीचा आदेश जारी केला आहे. बैलहोंगल, नेसरगी, दोडवाड व कित्तूर पोलीस स्थानकांच्या कार्यक्षेत्रात मंगळवार दि. 26 मार्चच्या सकाळी 6 पासून बुधवार दि. 27 मार्चच्या सकाळी 6 पर्यंत दारूविक्री बंदी असणार आहे.

Advertisement

रामदुर्ग, कटकोळ पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात सोमवार दि. 25 मार्च ते 27 मार्चपर्यंत दारूविक्री बंदीचा आदेश जारी असणार आहे. सुरेबान, मणिहाळ येथे 27 मार्चच्या सकाळी 6 ते 28 मार्चच्या सकाळी 6 पर्यंत, मुरगोड पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रातील शिवापूर येथे 26 मार्चच्या सकाळी 6 ते 28 मार्चच्या सकाळी 6 पर्यंत, सौंदत्ती व शिंदोगी ग्राम पंचायतीच्या कार्यक्षेत्रात 26 मार्चच्या सकाळी 6 ते 28 मार्चच्या सकाळी 6 पर्यंत दारूविक्री बंदीचा आदेश जारी असणार आहे.

अथणी शहरात 29 मार्चच्या सकाळी 6 ते 30 मार्चच्या सकाळी 6 पर्यंत तर कागवाड पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात 29 मार्चच्या सायंकाळी 6 ते 31 मार्चच्या सकाळी 6 पर्यंत, कुडची पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रातील चिंचली व मोरब येथे 30 मार्चच्या सकाळी 6 ते 31 मार्चच्या सकाळी 6 पर्यंत, रायबाग शहर, रायबाग रेल्वेस्टेशन, जलालपूर, यड्राव, निडगुंदी, मेखळी, नंदिकुरळी येथे 29 मार्चच्या सकाळी 6 ते 30 मार्चच्या सकाळी 6 पर्यंत दारूविक्री बंदी आहे.

Advertisement

चिकोडी शहर, कब्बूर, जागनूर, नागरमुन्नोळी, करोशी येथे 29 मार्चच्या रात्री 8 पासून 31 मार्चच्या सकाळी 6 पर्यंत, सदलगा पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रातील सदलगा, एकसंबा, बोरगाव, बेडकिहाळ, गळतगा, भोज, मांगूर, कुसनाळ, माणकापूर, कारलगा, शमनेवाडी येथे 29 मार्चच्या रात्री 8 ते 31 मार्चच्या सकाळी 6 पर्यंत, निपाणी शहर व ग्रामीण भागातील कोगनोळी, शिवापूरवाडी क्रॉस, आप्पाचीवाडी, अकोळ परिसरात 30 मार्चच्या सकाळी 6 ते 31 मार्चच्या सकाळी 6 पर्यंत, खडकलाट, पट्टणकुडी, कोथळी, शिरगाव येथे 29 मार्चच्या सकाळी 6 ते 31 मार्चच्या सकाळी 6 पर्यंत, अंकली, मांजरी, इंगळीवाडी, रुपनाळ, केरुर येथे 30 मार्चच्या सकाळी 6 पासून 31 मार्चच्या सकाळी 6 पर्यंत, गोकाक शहर व तालुक्यातील कोण्णूर, बेनचिनमर्डी, खनगाव, ममदापूर क्रॉस, माणिकवाडी येथे 26 मार्चच्या सकाळी 6 ते 28 मार्चच्या सकाळी 6 पर्यंत, संकेश्वर, अम्मणगी, कणगला, शिप्पूर, अकिवाट, नांगनूर येथे 30 मार्चच्या सकाळी 6 ते 31 मार्चच्या सकाळी 6 पर्यंत तर हिडकल डॅम, पाच्छापूर, द•ाr, दादबानहट्टी, हंचनाळ, हत्तरगी परिसरात 29 च्या सकाळी 6 ते 31 मार्चच्या सकाळी 6 पर्यंत दारूविक्री बंदीचा आदेश जारी असणार आहे.

Advertisement
Tags :

.