For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शहर-तालुक्यात दोन दिवस दारूबंदी

06:25 AM Mar 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
शहर तालुक्यात दोन दिवस दारूबंदी
Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisement

होळी व रंगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहर व तालुक्यात दोन दिवस दारूविक्री बंदीचा आदेश जारी करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बनिंग यांनी यासंबंधीचा आदेश जारी केला आहे.

बेळगाव शहर व उपनगरात रविवार दि. 24 मार्चच्या दुपारी 2 पासून सोमवारी 25 मार्चच्या मध्यरात्री 11.59 पर्यंत वाईन शॉप, बार, दारू दुकाने बंद ठेवण्याचा आदेश बजावण्यात आला असून, क्लब व हॉटेलमध्येही या काळात दारूपुरवठा करू नये, अशी सूचना करण्यात आली आहे. या आदेशाचे पालन न करणाऱ्यांवर अबकारी कायद्यांतर्गत कारवाई करण्याचा इशाराही पोलीस आयुक्तांनी दिला आहे. अबकारी निरीक्षक व अबकारी अधीक्षकांनी यासाठी योग्य कारवाई करण्याची सूचनाही पोलीस आयुक्तांनी केली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.