लायोनेल मेस्सी 13 पासून भारत भेटीवर
वृत्तसंस्था/ कोलकाता
अर्जेन्टिनाचा महान फुटबॉलपटू लायोनेल मेस्सी भारत दौऱ्यावर येणार असून त्यात आता हैदराबाद शहराचाही दौऱ्यातील चौथे ठिकाण म्हणून निश्चित झाले आहे. मेस्सीने याबाबद सोशल मीडियावर स्पष्ट केले आहे.
मेस्सीला भारतात आणणारे साताद्रू दत्ता यांनी हैदराबाद हे या जीओएटी दौऱ्यातील चौथे केंद्र असल्याचे सांगितले. मेस्सीनेही इन्स्टाग्रामवर याबाबत माहिती देत भारतात खेळण्याची संधी मिळाल्याबद्दल कृतज्ञता व आनंद व्यक्त केला. तो आता भारतातील प्रमुख शहरे कोलकाता, मुंबई, दिल्ली व हैदराबाद येथे प्रवास करेल. त्याचा हा दौरा भारतीय फुटबॉल शौकिनांसाठी पर्वणी ठरणार आहे. 13 डिसेंबर रोजी कोलकात्यात त्याचे ग्रँड सिलेब्रेशन झाल्यानंतर त्याच दिवशी तो हैदराबादमध्ये पुढील टप्प्यासाठी दाखल होईल. त्या ठिकाणी छोटा फुटबॉल सामना, कार्यशाळा व संगीतमय मानवंदना व सत्कार समारंभ असे कार्यक्रम होतील. मुंबईत 14 डिसेंबर रोजी तर दिल्लीत 15 डिसेंबरला कार्यक्रम होतील.