लिंगराज कॉलेज सर्वोत्तम एनएसएस पुरस्काराने सन्मानित
त. भा. प्रतिनिधी/ बेळगाव
कित्तूर राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या एनएसएस विभागाच्यावतीने पुरस्कार वितरण सोहळा नुकताच पार पडला. यामध्ये केएलई सोसायटीच्या लिंगराज कॉलेजला सर्वोत्तम एनएसएस युनिट 2025-26 पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. कुलगुरु प्रा. सी. एम. त्यागराज यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण झाले.
शनिवारी झालेल्या या कार्यक्रमाला बेंगळूर येथील एनएसएसचे विभागीय संचालक गिरीधर उपाध्याय, राज्य एनएसएस अधिकारी डॉ. प्रताप लिंगाय, इंदिरा गांधी एनएसएस पुरस्कारप्राप्त प्रा. रवी एकुला, रजिस्ट्रार संतोष कामगौडा, रजिस्ट्रार प्रा. डी. एन. पाटील, प्रा. बी. एस. नावी यासह इतर उपस्थित होते.
लिंगराज महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे समन्वयक डॉ. शशिकांत कोण्णूर, प्राचार्य डॉ. एच. एस. मेलिनमनी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत होते. या सर्वांची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.
