For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रिझर्व्ह बँकेच्या बैठकीत रेपो दर जैसे थे राहण्याची शक्यता

06:03 AM Jun 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
रिझर्व्ह बँकेच्या बैठकीत रेपो दर जैसे थे राहण्याची शक्यता
Advertisement

बुधवारपासून बैठक, 5 रोजी होणार अंतिम निर्णय

Advertisement

वृत्तसंस्था, मुंबई

दर दोन महिन्यातून एकदा होणारी रिझर्व्ह बँकेची मासिक पतधोरण समितीची बैठक 3 जूनपासून सुरु होत असून यामध्ये रेपो दरात कोणताही बदल होणार नसल्याचे संकेत तज्ञांनी व्यक्त केले आहेत. 5 जून रोजी रिझर्व्ह बँकेच्या बैठकीत रेपो दराबाबतचा निर्णय जाहीर केला जाणार आहे.

Advertisement

विविध बाबींवर होणार चर्चा

रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची आर्थिक वर्षाची दुसरी बैठक बुधवार 3 जूनपासून गर्व्हनर संजय मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. जागतिक आर्थिक आव्हानांच्या पार्श्वभूमीवर विकास व महागाई दरात बदल होण्याची शक्यता आहे. देशातल्या अधिकतर अर्थतज्ञांच्या मते सदरच्या बैठकीत रेपो दर जैसे थे ठेवला जाईल. सध्याला रेपो दर 5.25 टक्के इतका आहे. सध्याच्या स्थितीत रेपोदरात कपात करणे जोखमीचे ठरणार आहे. महागाई नियंत्रणात आणण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले आहेत.

महागाईवर लक्ष

मार्चच्या तुलनेत एप्रिलमध्ये महागाई काहीशी वाढली आहे. सदरचा सलगचा सहावा महिना महागाई वेग पकडते आहे. खाद्य महागाई वाढत 4.2 टक्क्यावर राहिली आहे. मेची आकडेवारी येणे बाकी आहे. मान्सूनसंबंधीचे अडथळे व पुरवठा साखळी विस्कळीत होण्याच्या अडचणी तसेच भाज्या, खाद्यान्नाच्या वाढत्या किमती या साऱ्या परिस्थितीचा आढावा घेऊन समिती सदस्य चर्चा करुन रेपो दराबाबत अंतिम निर्णय घेणार आहेत. अमेरिका इराण यांच्यातील युद्धाचा तणाव, कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ, रुपयावर वाढणारा दबाव यांचाही विचार बैठकीत केला जाणार आहे. 3 जूनला सुरु होणारी बैठक 5 जून रोजी संपणार असून शुक्रवारी रेपो दराबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

Advertisement
Tags :

.