महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

जैसे की ऋतुपतीचे द्वार...

06:44 AM Apr 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

हिंदु पंचांगातील शेवटचा महिना फाल्गुन शिशिराचा कहर अगदी शिगेला पोहचलेला. इकडे आमचा मार्च एंड. तिकडे प्रत्येक पानाचं ऑडीट करायला बसलेली पानगळ. शॉर्ट टर्मचे तात्पुरते फायदे मिळाले असले तरी लाँगटर्म इन्व्हेस्टमेंटचे आंब्याचे मोहोर झुलायला लागले की समजावं निसर्गाचे शेअर मार्केट वधारले आहे. हे सांगायला अनेक ठिकाणची चाफ्याची झाडं फांदी फांदीला भरपूर फुलासहित बुके होऊन सजतात. दुसरीकडे सृष्टीला सुंदर स्वप्न पडावं तसं निळ्या आभाळावर शेडिंग करावं तसंच एक पेंटींग तयार होत असतं. ते म्हणजे नीलमोहराचे झाड. सर्वांगाने फुलून येणारं पर्णहीन नीलकांती झाड म्हणजे नीलमोहोर. निळाईने सजून जणू आकाशाला विचारत असतो रंग

Advertisement

तुझ्यासारखा आलाय ना? अगदी...

Advertisement

‘तुझेच रंग लेवूनी, तुझ्या पुढे खट्याळसा....

कृष्ण रूप जाहलो, रंगल्या दिशादिशा.....’

प्राणप्रिय राधेसाठी कृष्ण रूपातली पृथ्वीवरची अभिव्यक्ती म्हणजे नीलमोहोर या ऋतुतलं मोठं आकर्षण. त्याची दखल घेतल्याशिवाय आपलं पाऊल पुढे पडतच नाही.

मोगरा.......इंद्रधनुचे सातही रंग आपल्या मुठीत घेऊन येणारं एकमेव फूल म्हणजे मोगरा. चैत्राचा सांगावा घेऊन आलेला चिमुकला देवदूतच. एका छोट्याशा फुलामुळे, त्याच्या सुगंधामुळे उन्हाची तगमग संपते आणि आम्ही पुढच्या क्षणाचे रंग, गंध शोधायला सज्ज होतो. वैराग्याची पांढरी वस्त्र लेऊन वसंत वैभवाचे रंगोत्सव दाखवणारं फूल म्हणजे मोगरा याचं नेमकं वर्णन करताना कवि ग्रेस लिहितात.......

‘अलभ्य फुलला घन वसंत हा मोगरा.......

विनम्र लपवू कुठे ऋदय स्पंदनांचा झरा.......’

पळसाचं मात्र तसं नसतं. वर्षभर नुसताच पर्णभार सांभाळणारा, रूंद पानं लोकांच्या जेवणात पत्रावळीसाठी देतांना आता जुनी, जीर्ण पानं टाकून कृतकृत्य झालेला असतो. सगळेच मुखवटे, चेहरे गळून पडल्यावर जो अलिप्तपणा येतो तो पळसालाही येतोच. त्याचं हे वैराग्य मात्र सगळ्यांच्या डोळ्यात त्याच्या लालभडक फुलामुळे खुपायला लागतं. क्रांतीच्या मशाली पेटवून एखादा कम्युनिस्ट उभा राहायलाय असेही वाटून जाते. आणि उन्हाची तलखी उगीचच जास्त झाली असे वाटते. अशा या उन्हात पक्षांसाठी पाण्याच्या सुराया फुलांमध्ये दडवून ठेवणारी पिचकारीची झाडही तयार असतात आणि हो कावळ्याच्या पिलांना कोकीळेचे तात्पुरते पाळणाघर काही काळापुरते मिळतेच.

पूर्वार्ध

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article