महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

डीआरडीओने बनवले हलके बुलेटप्रूफ जॅकेट

06:18 AM Apr 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

डीआरडीओ’चे आत्मनिर्भर पाऊल : स्नायपर बुलेट्स रोखण्याचीही क्षमता

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

संरक्षण क्षेत्रात भारत सातत्याने नवनवीन उंची गाठत आहे. ‘आत्मनिर्भर भारत’चे स्वप्न पूर्ण करण्याच्या प्रयत्नात सातत्याने यश मिळत आहे. याच क्रमाने संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) आता यशाचा नवा अध्याय लिहिला आहे. डीआरडीओने देशातील सर्वात हलके बुलेटप्रूफ जॅकेट बनवले आहे. डीआरडीओच्या या यशाची माहिती बुधवारी संरक्षण मंत्रालयाने दिली.

देशातील सर्वात हलके बुलेटप्रूफ जॅकेट हे पॉलिमर बॅकिंग आणि मोनोलिथिक सिरॅमिक प्लेटचे बनलेले आहे. चाचणीदरम्यान या जॅकेटमध्ये 6 स्नायपर बुलेट्सही घुसू शकल्या नाहीत. हे जॅकेट सैनिकांचे दाऊगोळ्यापासून संरक्षण करेल. कानपूर येथील डीआरडीओच्या डिफेन्स मटेरियल अँड स्टोअर्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लशिमेंटने (अएRअ) हे जॅकेट तयार केले आहे. या जॅकेटची बीआयएस 17051-2018 अंतर्गत टीबीआरएल चंदीगड येथे चाचणी घेण्यात आली.

डीआरडीओने बनवलेले लाइट बुलेटप्रूफ जॅकेट हे मोठे यश असल्याचे बोलले जात आहे. खरे तर सध्या सैनिक वापरत असलेल्या बुलेटप्रूफ जॅकेटचे वजन जास्त असल्यामुळे गंभीर चकमकीवेळी सैनिकांना अतिरिक्त भार सहन करावा लागतो. आता त्यांना यातून दिलासा मिळू शकतो. हे हलके बुलेटप्रूफ जॅकेट विकसित केल्याबद्दल डीआरडीओच्या अध्यक्षांनी ‘डिफेन्स मटेरियल अँड स्टोअर्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लशिमेंट’चे अभिनंदन केले आहे.

नवीन बुलेटप्रूफ जॅकेट एर्गोनॉमिकली डिझाइन केलेले फ्रंट हार्ड आर्मर पॅनेल (एचएपी) पॉलिमर बॅकिंग आणि मोनोलिथिक सिरॅमिक प्लेटने बनलेले आहे. ते कारवायांदरम्यान सैनिकांना परिधान करणे पूर्वीपेक्षा अधिक आरामदायक आणि सुरक्षित असेल, असे संरक्षण मंत्रालयाने सांगितले.

भारतीय लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे नवी दिल्लीत ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशनच्या नवव्या राष्ट्रीय नेतृत्व परिषदेत या जॅकेटच्या निर्मितीबाबत कौतुकोद्गार काढले. त्यांनी संरक्षण क्षेत्रातील स्वावलंबनाच्या महत्त्वावरही भाष्य केले.  जिथे राष्ट्रीय हितसंबंध असतात तिथे देश युद्ध करायला मागेपुढे पाहत नाहीत, असे अलीकडच्या भू-राजकीय घडामोडेनी दाखवून दिल्याचे त्यांनी सांगितले. युद्धे रोखण्यासाठी तसेच हल्ल्यांना जोरदार प्रत्युत्तर देण्यासाठी आणि आवश्यक असल्यास युद्ध जिंकण्यासाठी लष्करी शक्ती आवश्यक असल्याचे प्रतिपादनही त्यांनी केले.

Advertisement
Next Article