For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Sangali News : बांबवडेत नारळाच्या झाडावर कोसळली वीज

03:59 PM Apr 03, 2026 IST | NEETA POTDAR
sangali news   बांबवडेत नारळाच्या झाडावर कोसळली वीज
Advertisement
विजांच्या कडकडाटासह सांगलीत पावसाची हजेरी 
पलूस : पलूस तालुक्यातील बांबवडे येथे गुरुवारी पहाटे सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास परिसरात विजांचा कडकडाटासह आणि पावसाने दमदार हजेरी लागली. या दरम्यान काळात येथील जयवंत पवार यांच्या बागेत असणाऱ्या नारळाच्या झाडावर वीज कोसळल्याची घटना घडली.
विजेच्या प्रहारामुळे सुमारे ५० फूट उंचीचे नारळाचे झाड मोडून पडले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र झाड पूर्णपणे पडल्यामुळे बागेचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. नारळाच्या झाडाजवळच विद्युत तारा आहेत. मात्र विजांचा कडकडाट सुरू असताना महावितरणने खबरदारीचा उपाय म्हणून तात्काळ विद्युत पुरवठा खंडित केला होता. त्यामुळे संभाव्य अपघात टळला.
पलूस तालुक्यातील बांबवडे येथे गुरुवारी पहाटे विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. यादरम्यान जयवंत पवार यांच्या बागेतील एका ५० फूट उंचीच्या नारळाच्या झाडावर वीज कोसळली. सुदैवाने, महावितरणने वेळीच वीजपुरवठा खंडित केल्यामुळे मोठा अनर्थ टळला. कर्मचाऱ्यांनी तातडीने परिस्थितीची पाहणी करून वीजपुरवठा पुन्हा सुरू केला. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी परिसरात काही काळ भीतीचे वातावरण होते.
दरम्यान जोरदार वारे व विजांच्या कडकडाटामुळे पलूस शहर व आसपासच्या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यातच जयवंत पवार यांच्या बागेतील नारळाच्या झाडावर विजेचा मोठा प्रहार झाल्याने सुमारे ५० फूट उंचीचे झाड कोसळले त्यामुळे बागेचे काही प्रमाणात नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. तर खबरदारीचा उपाय म्हणून वीज कंपनीने याकाळात वीज पुरवठा बंद केला होता.
Advertisement
Advertisement
Tags :

.