मेघगर्जनासह फोंड्यात पावसाच्या हलक्या सरी
06:52 AM Apr 26, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
त. भा. प्रतिनिधी
Advertisement
फोंडा : फोंडा तालुक्यातील काही भागात शनिवारी सायंकाळी विजांच्या कडकडाटासह पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. त्यामुळे सकाळपासून ढगाळ हवामान व वाढलेल्या प्रचंड उष्म्यापासून वातावरणात काहीसा थंडावा निर्माण झाला. मात्र कुठेच पडझड किंवा अनुचित प्रकार घडल्याचे वृत्त नाही.
फोंडा शहरात सायं. 7.30 वा. सुमारास साधारण वीस मिनिटे मेघगर्जनासह व हलक्या पावसाचा शिडकावा झाला. तालुक्यातील अन्य काही भागामध्ये त्रोटक सरी कोसळल्या. सकाळपासूनच हवामानात प्रचंड उष्मा व तापमानाचा पारा दुपारपर्यंत वाढल्याने बाहेर फिरणे असह्या झाले होते. वाढत्या उकाड्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून घरातही पंख्ये व वातानुकुलीत यंत्रणेशिवाय राहणे अवघड बनले होते. त्यावर या हलक्या पावसाच्या सरींचा कासाविस झालेल्या जीवांना थोडासा दिलासा मिळाला.
Advertisement
Advertisement