For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Sangli Weather | सांगलीकरांना उकाड्यापासून काहीसा दिलासा! जून संपताना शहर आणि परिसरात पावसाची पहिली हलकी हजेरी

05:32 PM Jun 23, 2026 IST | NEETA POTDAR
sangli weather   सांगलीकरांना उकाड्यापासून काहीसा दिलासा  जून संपताना शहर आणि परिसरात पावसाची पहिली हलकी हजेरी
Advertisement

सांगली : मागील काहीदिवसापासून उकाड्याने हैराण झालेल्या सांगलीकरांना काहीसा दिलासा मिळाला. सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास सांगली शहर व परिसरात पावसाच्या हलक्या सरी झाल्या. यामुळे काही काळासाठी लोकांना दिलासा मिळाला परंतु दुपारनंतर मात्र पुन्हा उकाड्याने लोक हवालदील झाले.

Advertisement

मागील काही दिवसापासून पावसाने दडी मारली आहे. जून महिना संपत आला तरी मॉन्सूनची जिल्ह्यात हजेरी झाली नव्हती. सोमवारी मात्र अंधारून आलेल्या शहर परिसरात सकाळी अकराच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. यामुळे उकाड्यामुळे हैराण झालेल्या सांगलीकरांना काहीसा दिलासा मिळाला. साडेअकरापर्यंत सांगलीशहर तसेच आसपासच्या माधवनगर बुधगाव बिसूर येथेही हलका पाऊस झाला. माधवनगर रोड, लक्ष्मीनगर जकात नाका, साखर कारखाना, औद्योगिक वसाहत, चिंतामणीनगर, कलानगर, रेल्वे उड्डाणपूल, बायपास रोड, कॉलेज उत्तर शिवाजीनगर, राम मंदिर कॉर्नर आदी भागात हलका पाऊस झाला. सांगलीवाडी, कर्नाळ या भागातही पावसाच्या हलक्या सरी झाल्या.

माधवनगर रोडवर चौपदरीकरण सुरू असलेल्या काँक्रीटच्या रस्त्यावर एक मोठे वाहन बंद पडल्याने रोडवर दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली. त्यातच पावसाला सुरुवात झाल्याने प्रत्येक जण गाडी पुढे काढण्याचा प्रयत्न करू लागला त्यातून वादावादी आणि हमरी तुमरी सुरू झाली. अखेर काही दुचाकीस्वार आणि हलक्या वाहनेंनी संजयनगरची वाट धरल्याने वाहतूक सुरळीत झाली.

Advertisement

Advertisement
Tags :

.