For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

डोपिंग प्रकरण : पाकिस्तान वेटलिफ्टिंग अधिकाऱ्यांवर आजीवन बंदी

06:42 AM Apr 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
डोपिंग प्रकरण   पाकिस्तान वेटलिफ्टिंग अधिकाऱ्यांवर आजीवन बंदी
Advertisement

वृत्तसंस्था, लॉसेन

Advertisement

‘कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट’ (सीएएस) च्या ‘अँटी डोपिंग विभागा’ने (एडीडी) पाकिस्तान वेटलिफ्टिंग फेडरेशनचे निलंबित प्रमुख हाफीज इम्रान बट आणि प्रशिक्षक इरफान बट यांच्यावर आजीवन बंदी लादली आहे. 2014 ते 2016 या कालावधीत देशातील खेळाडूंना बंदी घातलेली उत्तेजक द्रव्ये दिल्याप्रकरणी त्यांच्या सहभागामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.

पाकिस्तान वेटलिफ्टर अबुबाकर गनी यांच्यावरही चार वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. डोप चाचणीत अपयशी ठरल्याचे स्पष्टीकरण देण्यासाठी त्याने बनावट वैद्यकीय चिठ्ठ्या सादर केल्या होत्या. ताश्कंद येथे 2021 मध्ये झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेदरम्यान गनीच्या चाचणीत ‘टॅमॉक्सिफेन मेटाबोलाईट’ हे प्रतिबंधित संप्रेरक आणि चयापचय नियंत्रक आढळले होते.

Advertisement

डोपिंग नियमांच्या उल्लंघनावर सीएएसचा निकाल

हाफिज आणि इरफान यांना दोषी ठरवणाऱ्या आपल्या निकालात सीएएस, एडीडीने असे नमूद केले आहे की, खेळाडूंना सहाय्य करणाऱ्या या दोन्ही व्यक्तींचा पाकिस्तानी खेळाडूंना ज्यामध्ये अल्पवयीन खेळाडूंचाही समावेश होता. स्टिरॉईड्ससह इतर प्रतिबंधित उत्तेजक द्रव्ये देण्यामध्ये थेट सहभाग होता. तसेच पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात चालणाऱ्या डोपिंग प्रकरणामध्ये त्यांनी मध्यवर्ती भूमिका बजावली होती. त्यांच्या वर्तनाचे स्वरुप आणि गांभीर्य लक्षात घेता यातील प्रत्येक व्यक्तींवर लागू होणारी कमाल कालावधीची शिक्षा म्हणजेच आजीवन बंदी लादण्यात आली आहे.

Advertisement
Tags :

.