Satara News : श्रमाला प्रतिष्ठा दिल्यास जीवन यशस्वी : शिरसाठ
'गर्जा महाराष्ट्र माझा २०२६'ला उत्स्फूर्त प्रतिसाद, सर्वोदय सेवा ट्रस्टचा उपक्रम
वाई : संस्कृती,सामाजिक एकोपा आणि राष्ट्रणिता याचबरोबर प्रेरणादायी श्रम, बुद्धी, पैसा हा जीवनात यशस्वी होण्याचा मंत्र आहे. खऱ्या अर्थाने श्रमाला प्रतिष्ठा दिल्यास जीवन यशस्वी होते. कार्यक्रमात 'गावा महाराष्ट्राची' या विषयाबर मार्गदर्शन करताना मुंबई येथील विचारवंत,प्रबोधनकार दशरथ शिरसाठ बोलत होते.
महाराष्ट्र दिन, कामगार दिन व मराठी राज्यभाषा दिनाच्या औचित्याने सर्वोदय सेवा ट्रस्ट,वाई यांच्या वतीने आयोजित 'गर्जा महाराष्ट्र माझा" कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी सामाजिक संस्था मे कार्यकर्त्यांचा गौरव करण्यात आला.यावेळी सुगम संस्था प्रबोधनात्मक व्याख्यान यांच्या संगमामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली.
अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष अनिल सावंत होते.प्रमुख उपस्थितीत जिल्हा परिषद सदस्य बापूसाहेब शिंदे,आनंद चिरगुटे,नगरसेवक भारत खामकर,नगरसेवक विजय ढेकाणे,काशिनाय शेलार,समाजसेबिका लक्ष्मीताई कळवे तसेच जीवन विद्या मिशनच्या अध्यक्षा स्वाती मांढरे यांचा समावेश होता.
प्रस्ताविकात उपाध्यक्ष प्रकाश वाडकार यांनी सर्वोदय सेवा ट्रस्टतर्फे वृक्षलागवड,रक्तदान शिबिरे,गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, आपतीग्रस्तांना मदत.वधू-वर सूचक केंद्र,करिअर मार्गदर्शन, शालेय साहित्य वाटप व क्रीडा स्पर्धांचे आयोजन याबाबत माहिती दिली.अध्यक्षीय भाषणात अनिल सावंत यांनी कृष्णा सेवा कार्य फाउंडेशन,वाई यांच्या नदी स्वच्छता उपक्रमाचे कौतुक करत,
वाई शहर स्वच्छ ठेवणाऱ्या नगरपालिकेतील चतुर्व श्रेणी कर्मचाऱ्याविषयी अमिनाण व्यक्त केला.यावेळी 'सर्वोदय सेवा गौरव पुरस्कार कृष्णानदी सेवा कार्य फाउंडेशन,वाई तसेच वाई नगरपालिकेतील आदर्श सफाई कर्मचाऱ्यांना प्रदान करण्यात आला. सूत्रसंचालन संतोष वाडकर व वैशाली वाडकर यांनी केले.आभार आनंद गायकवाड यांनी मानले.या यशस्वी आयोजनासाठी ट्रस्टचे अध्यक्ष संजय जेधे, सचिव संतोष वाडकर,उपाध्यक्ष प्रकाश वाडकर, खजिनदार नागदेव वाशिवले तसेच सर्व संचालक व सभासद यांनी परिश्रम घेतले.